Tuesday, January 20, 2026
Home मराठी ‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसा आठवतेय का? सध्याचा लूक पाहून म्हणाल, हिच का ती?

‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसा आठवतेय का? सध्याचा लूक पाहून म्हणाल, हिच का ती?

झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ तुम्हाला आठवतच असेल. या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम व प्रतिसाद मिळाला. यातील सर्व पात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले होते. या मालिकेचे भव्य आणि दिव्य चित्रीकरण प्रेक्षकांना भावले. तसेच या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी ‘म्हाळसा’ तर तुम्हाला आठवतच असेल.

या मालिकेत म्हाळसाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभी हांडे (Surabhi Hande) होय. तिने या मालिकेत उत्कृष्ट भूमिका निभावली होती. मालिकेतील तिच्या या पात्रासाठी तिला प्रेक्षकांकडून खूप वाह वाह मिळाली. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्याचं कारण तिचे लेटेस्ट फोटोशूट आहे. होय, या अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट फोटोशूट फोटो शेअर करून सोशल मीडियाला आग लावली आहे.

सुरभी हांडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये ती उभा राहून पोझ देत दुसरीकडे पाहताना दिसत आहे. यामध्ये तिने वन पीस परिधान केला आहे. जो बदामी आणि हिरव्या रंगाचा आहे. त्यासह अभिनेत्रीने काळ्या रंगाचा हिल्स सॅंडल घातला आहेत. त्याचबरोबर अभिनेत्रीने इयर रिंग घालून पूर्ण केला आहे.

काही तासांतच अभिनेत्रीच्या या फोटोला एक हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अभिनेत्रीचा या फोटोवर जोरदार कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. याचा पुरावा कमेंट सेशनमध्ये पहायला मिळत आहे. अभिनेत्रीने फोटोसाठी दिलेली हटके पोझ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री सुरभी हांडे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा