Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे ! अभिनेत्री सुरेखा कुडची यांची फेसबुक पोस्ट चर्चेत…

वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे ! अभिनेत्री सुरेखा कुडची यांची फेसबुक पोस्ट चर्चेत…

बिग बॉस मराठी च्या नवीन सीझनची सच्या चांगलीच चर्चा होताना दिसते आहे. या सीझनमध्ये अनेक सोशल मीडिया स्टार आणि मराठी मनोरंजन विश्वातील काही प्रसिद्ध कलाकार सहभागी आहेत. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवडयात निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात वाद झाला. वर्षाताईंमध्ये आणि घरातील इतर सदस्यांमध्ये देखील वाद दिसून आले. या सर्व प्रकरणावर बिग बॉस मराठी ३ च्या स्पर्धक आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांचा राग व्यक्त केला आहे.

सुरेखा कुडची यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय की, ‘बिग बॉस मराठी सीझन ५ खूप आतुरतेने वाट पहाट होते. वर्षाताई आणि पॅडीला पाहून मनापासून आनंद झाला. पण काही स्पर्धक मराठी असून सुद्धा मराठी लोकांच्या मानसिकतेवर बोलतात तेव्हा वाईट वाटतं. मी स्वतः साऊथची आहे.. माझी भाषा कन्नड आहे पण मला ओळख दिली या महाराष्ट्राने आपल्या महाराष्ट्रात कलाकारांवर प्रेम करणारे त्यांचा आदर करणारे प्रेक्षक आहेत.

सुरेखा पुढे लिहितात, “असं असताना आज बिग बॉसच्या घरात आपल्या वयापेक्षा दुप्पट असलेली, एक काळ मराठी चित्रपट इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री वर्षाताईंचा जेव्हा अपमान करतात तेव्हा वाईट वाटत… मान्य आहे त्या घरात सगळे सारखे आहेत सगळे स्पर्धक आहेत पण तरीही बोलताना वयाचा भान राखण गरजेचे आहे असं मला वाटतं. ३ महिन्यांचा खेळ संपला की शेवटी तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हेच पाहिलं जात.. आणखी एक नवल म्हणजे आत्ता कुठे एक मलिका संपवून आलेले कलाकार जेव्हा आपल्या सिनियरला पाण्यात पाहतो, त्यांच्यावर हसतो हे पाहिल्यावर लाज वाटते…. असो वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमचा बाजूने उभा आहे.”

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

शाहरुख खानच्या घरी पार्टीत काय काय होते; राघव जुयालने केले खुलासे

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा