Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड Heart Attackनंतर अवघ्या 8 दिवसात ‘ताली’च्या शूटिंगवर परतलेली सुष्मिता; निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा

Heart Attackनंतर अवघ्या 8 दिवसात ‘ताली’च्या शूटिंगवर परतलेली सुष्मिता; निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा

‘बिवी नंबर 1’, ‘मैं हूं ना’ यांसारखे हिट सिनेमे देणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहे. चर्चेमागील कारण म्हणजे सुष्मिता सेन ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला. ही वेबसीरिज ट्रान्सजेंडर गौरी सावंत हिच्या आयुष्यावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये सुष्मिताच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अशातच सीरिजच्या निर्मात्यांनी अभिनेत्रीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

‘ताली’च्या निर्मात्यांचा मोठा खुलासा!
‘ताली’ (Taali) वेब सीरिजचे निर्माते अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्याशी संबंधित रंजक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, “सुष्मिता इतकी मेहनती आहे की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही अवघ्या 8 दिवसात तिने वेब सीरिजची शूटिंग सुरू केली होती. ज्यावेळी आम्ही तिच्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी ऐकली होती, तेव्हा आम्ही सर्वजण तिच्या तब्येतीविषयी चिंतेत होतो.”

हृदयविकाराच्या झटक्याच्या 8 दिवसांनंतर शूटिंगवर परतलेली सुष्मिता
खरं तर, सोशल मीडियाद्वारे स्वत: सुष्मिता सेनने हार्ट अटॅकची (Sushmita Sen Heart Attack) माहिती दिली होती. ज्यामुळे चाहते खूपच चिंतेत होते. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये सांगितले होते की, जयपूरमध्ये ‘आर्या 3’ची शूटिंग करत होती, तेव्हाच तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर टीमने अभिनेत्रीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आता एकदम ठीक असून ती आगामी प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

कधी होणार रिलीज?
निर्मात्यांनी असेही सांगितले की, तब्येत खराब असूनही सुष्मिताने शानदार अभिनय केला. तिने निर्मात्यांकडे कोणतीही तक्रार न करता मनापासून काम केले. तसेच, रवी जाधव (Ravi Jadhav) सुष्मिताच्या आगामी ‘ताली’ या वेबसीरिजमधील तिच्या पात्राविषयी बोलायचं झालं, तर ती तृतीयपंथी गौरी सावंत (Transgender Gauri Sawant) हिच्या पात्रात आहे. ही मालिका 15 ऑगस्ट रोजी ओटीटी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. (actress sushmita sen after heart surgery back to work for series taali shooting )

हेही वाचा-
जेव्हा सपना चौधरीने पहिल्यांदा केलेला स्टेज तोड डान्स, चाहत्यांनी केली होती तुडुंब गर्दी- व्हिडिओ
टीजरसह ‘Don 3’ची घोषणा, शाहरुखच्या जागी ‘हा’ अभिनेता बनणार डॉन? नेटकरी म्हणाले, ‘नो एसआरके नो डॉन’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा