Thursday, September 28, 2023

टीजरसह ‘Don 3’ची घोषणा, शाहरुखच्या जागी ‘हा’ अभिनेता बनणार डॉन? नेटकरी म्हणाले, ‘नो एसआरके नो डॉन’

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने त्याच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्याच्या सुपरहिट सिनेमांमध्ये ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ या सिनेमांचाही समावेश राहिला आहे. या सिनेमांमध्ये शाहरुखने डॉन पात्र साकारून अक्षरश: धमाल केली होती. आता ‘डॉन’ फ्रँचायझीच्या निर्मात्यांनी एक टीझर रिलीज केला आहे, जो पाहून असे म्हटले जात आहे की, हा टीजर ‘डॉन 3’ सिनेमाचा आहे.

निर्मात्यांनी शेअर केला ‘डॉन 3’चा टीजर?
मागील काही काळापासून ‘डॉन 3’ सिनेमाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सिनेमाविषयी सातत्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशात निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक टीझर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. नुकतेच एक्सेल एंटरटेनमेंट (Excel Entertainment) प्रॉडक्शन हाऊसने ट्विटर अकाऊंटवरून एक टीजर व्हिडिओ शेअर केला आहे. या टीजरमध्ये फक्त 3 हा आकडा हायलाईट केला गेला आहे. यासोबतच असे लिहिले आहे की, “एक नवीन काळ सुरू.” या टीजरवरून चाहत्यांना वाटत आहे की, ‘डॉन 3’ सिनेमाविषयी हिंट दिली गेली आहे.

फरहान अख्तरनेही शेअर केला व्हिडिओ
अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक फरहान अख्तर (Farhan Akhtar) यानेही हाच व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

या व्हिडिओव्यतिरिक्त फरहानने ‘डॉन’ फ्रँचायझीबाबत एक पोस्टही शेअर केली आहे. तसेच, डॉनचा नवीन काळ हा 2025मध्ये सुरू होणार असल्याचेही सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

सोशल मीडियावर ही क्लिप समोर येताच ‘डॉन 3’ ट्रेंड होऊ लागला. नेटकरी या सिनेमाबाबत अंदाज बांधत आहेत. असेही म्हटले जात आहे की, या सिनेमाचा अधिकृत टीजर लवकरच रिलीज केला जाणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘डॉन 3’चा टीजर ‘गदर 2’ (Gadar 2)सोबत रिलीज केला जाईल. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाहीये.

शाहरुखची जागा घेणार रणवीर सिंग?
‘डॉन 3’ सिनेमात शाहरुख दिसणार नसल्याची चर्चा आहे. त्याच्या जागी रणवीर सिंग (Ranveer Singh) ‘डॉन’ पात्र साकारणार आहे. ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ सिनेमात शाहरुखने ‘डॉन’ पात्र साकारून प्रेक्षकाची मने जिंकली होती. मात्र, ‘डॉन 3’मध्ये शाहरुख नसल्याने चाहते निराश झाले आहेत. चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “नो एसआरके, नो डॉन.” आणखी एकाने लिहिले की, “कोणालाही शाहरुखशिवाय नवीन काळ नको आहे.” याव्यतिरिक्त आणखी एकाने लिहिले की, “शाहरुखशिवाय डॉनची कल्पनाही करू शकत नाही.”

‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ ब्लॉकबस्टर
सन 2006मध्ये शाहरुख खान अभिनित ‘डॉन’ सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकंली होती. त्यानंतर 5 वर्षांनी 2011मध्ये ‘डॉन 2’ सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात प्रियांका आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत होत्या. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. (big news farhan akhtar announces don 3 know details here)

हेही वाचा-
काळीज तोडणारी बातमी! बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
‘Kaavaalaa’ गाण्यावर डान्स करताच अभिनेत्री ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कट’

हे देखील वाचा