Friday, July 5, 2024

अभिनेत्री सुष्मिताच्या वहिनीने केले बेबी बंपमधील फोटो शेअर; लाल साडीत सुंदर दिसतेय चारु असोपा

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी आणि  टीव्ही अभिनेत्री चारु असोपा प्रेग्नंट आहे. चारु ही सुष्मिताचा भाऊ राजीव सेनची पत्नी आहे. राजीव आणि चारु सध्या खूपच आनंदी आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील येणाऱ्या छोट्या पाहुण्याची वाट पाहत आहेत.

चारुने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चारु असोपा साडी परिधान केलेली दिसत आहे. ती या साडीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. चारुच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

फोटोमध्ये चारुने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तिच्या हातात बांगड्या, बिंदी, कानात लांब झुमके आणि हेअर बन आहे. यामध्ये तिचं रूप खुललं आहे. तिने खूप कमी मेकअप केल्याचे या फोटोत दिसून येत आहेत.

चारुच्या या लाल साडीत तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. बेबी बंप धरताना चारुने पोझही दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर कंमेंट करताना चाहते तिच्या डिलिव्हरीची डेट विचारत आहेत. तिचे चाहते म्हणत आहे की, ते आता अजून वाट नाही बघू शकत.

तसेच फक्त चारुचे कुटुंबच नाही, तर तिचे चाहते देखील छोट्या पाहुण्याची वाट पाहत आहेत. सुष्मिता आणि तिच्या दोन मुलीही नवीन पाहुण्याची वाट बघत खुश आहेत. चारुचे तिच्या वहिनी सुष्मिता सेन हिच्यासोबत चांगले संबंध ठेवते.

चारुने याआधी देखील बेबी बंपचे छान फोटो देखील शेअर केले होते. तिने पारंपारिक आणि वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोज क्लिक केले आहेत. तिने बॉडी फिट स्टायलिश गाऊनमध्ये मॅटर्निटी फोटोशूटही केले आहेत. ज्यात ती तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत होती.

चारु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर तिच्या दैनंदिन दिनचर्या आणि गर्भधारणेशी संबंधित गोष्टींबद्दल अपडेट देत असते. विशेष म्हणजे चारुच्या व्लॉगला भरपूर व्ह्यूज मिळतात.

चारु आणि राजीव यांचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात तणावाच्या बातम्याही आल्या होत्या. दोघेही वेगळे राहू लागले. नंतर त्यांच्यातील सर्व कटुता दूर झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत हे दोघे एकत्र आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

हे देखील वाचा