माधुरी ते ऐश्वर्या, ‘या’ अभिनेत्रींनी तोडले अभिनेत्यांचे हृदय, एकीने तर १० जणांना…


लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा चित्रपट जगतात वारंवार होत असतात. असे अनेक कलाकार आहेत जे एकदा नाही, तर अनेकवेळा प्रेमात पडले आहेत. या कलाकारांमध्ये बॉलिवूडच्या अशा काही सौंदर्यवती आहेत. ज्यांनी एकदा नव्हे, तर अनेकवेळा चाहत्यांसोबतच अभिनेत्यांच्या हृदय तोडले आहे. चला तर मग त्या अभिनेत्रींची यादी पाहूया, ज्यांनी मुलांचे हृदय तोडताना उफ्फ पण नाही केले.

सुष्मिता सेन
अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) अलीकडेच बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअपची घोषणा केली. रोहमन शॉलला (Rohman Shawl) जवळपास ३ वर्षे डेट केल्यानंतर अभिनेत्रीने हे नाते संपवले. अभिनेत्रीचा ब्रेकअप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या अभिनेत्रीने जवळपास १० मुलांचे हृदय तोडले आहे. या यादीत विक्रम भट्ट, रणदीप हुड्डा, बंटी सचदेवापासून इम्तियाज खत्रीपर्यंत अनेकांची नावे आहेत.

प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियांका चोप्राचेही (Priyanka Chopra) अनेक अफेअर्स होते. या अभिनेत्रीच्या लिंकअपची बातमी शाहरुख खानपासून ते शाहिद कपूरपर्यंत होती. प्रियांकाचे हरमन बावेजासोबतही अफेअर होते. अभिनेत्रीने त्यांच्यापैकी कोणाशीही लग्न केले नाही. तिने हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनासशी (Nick Jonas) लग्न करून आता सुखी आयुष्य जगत आहे.

दीपिका पदुकोण
अभिनेत्री दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) नावही अनेक हँडसम हंकसोबत जोडले गेले आहे. रणवीर सिंगसोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेत्रीचे रणबीर कपूरसोबत अफेअर होते. यापूर्वी या अभिनेत्रीचे नाव युवराज सिंग, सिद्धार्थ माल्या, निहार पांड्या आणि उपेन पटेल यांच्यासोबत जोडले गेले होते. नात्र, अभिनेत्रीचे नाते यापैकी कोणाशीही दीर्घकाळ टिकले नाही.

ऐश्वर्या राय
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत (Salman Khan) ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai) नाव विवेक ओबेरॉयसोबत (Vivek Oberoi) जोडले जाऊ लागले. विवेकने सलमान खानशी पंगा घेताच अभिनेत्री ऐश्वर्या रायने लगेचच त्याच्यासोबतचे सर्व संबंध संपवले आणि या वागण्याला इमॅच्युअर म्हटले होते.

जान्हवी कपूर
अभिनेत्री जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) तिचा पदार्पण चित्रपट ‘धडक’ स्टार ईशान खट्टरसोबत (Ishan Khattar) जोडले गेले होते. चित्रपटाच्या प्री-लाँच इव्हेंटमध्येही दोघे दिसले होते. त्यानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसले. त्यांचे प्रेम खुलतच होते, तेव्हाच जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांना हे नाते मान्य नव्हते. यानंतर अभिनेत्रीने लगेचच ईशानसोबत ब्रेकअप केले.

आलिया भट्ट
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) डेट करत आहे. याआधी या अभिनेत्रीचे नाव सिद्धार्थ मल्होत्राशी जोडले गेले होते. मात्र, अभिनेत्रीने काही महिन्यांतच हे नाते संपवले. काही दिवसांनंतर आलिया भट्टचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले जाऊ लागले.

बिपाशा बसू
अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि जॉन अब्राहमचे (John Abraham) नाते बरेच दिवस टिकले होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांमधील मतभेदांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. जॉनच्या आधी अभिनेत्रीने डिनो मोरियालाही डेट केले होते.

कॅटरिना कैफ
अभिनेत्री कॅटरिना कैफने (Katrina Kaif) नुकतेच विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्न केले. यापूर्वी या अभिनेत्रीचे नाव सलमान खान आणि रणबीर कपूरसोबत जोडले गेले होते. याशिवाय या अभिनेत्रीचे नाव सिद्धार्थ माल्यासोबतही जोडले गेले होते.

माधुरी दीक्षित
एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) नाव संजय दत्तसोबत (Sanjay Dutt) जोडले जाऊ लागले होते.

त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव समोर येताच माधुरीने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!