वयाची चाळिशी ओलांडली, तरीही ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री आहेत अविवाहित, मिळाला नाही ‘परफेक्ट जोडीदार’


बॉलिवूड कलाकारांना वैयक्तिक आयुष्य नसते, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही चाहत्यांना जाणून घ्यायची असते. हेच कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत असतात. मात्र, ते वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी व्यक्त होत असतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे लग्न अजून झालेले नाही. वयाची चाळिशी ओलांडली तरी देखील त्यांचे लग्न झाले नाही. यांनी सिंगल राहायचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊयात असे कोणते कलाकार आहेत, जे अजून विवाह बंधनात अडकले नाहीत. लग्न न झालेले कलाकार त्यांच्या जीवनात खूप खुश आणि यशस्वी देखील आहेत.

सुष्मिता सेन
अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) ‘आर्या २’ नुकताच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तिला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम देखील मिळाले आहे. परंतु सुष्मिता आणि तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सध्या चर्चा सुरू आहेत. त्या दोघांनी ब्रेकअप केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुष्मिता आणि रोहमन शॉल हे दोघे आता एकमेकापासून वेगळे झाले आहेत. ही माहिती स्वत: सुष्मिताने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यानंना दिली होती. सुष्मिता ४६ वर्षांची असून तिने रोहमनच्या आधी खूप साऱ्या मुलांना डेट केले आहे, परंतु तिला तिच्या आयुष्यातील जोडीदार अजून काही भेटला नाही.

शमिता शेट्टी
बॉलिवूडमधील फिटनेस अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty) हिचे नाव खूप लोकांसोबत जोडले गेले होते. यामध्ये उदय चोप्रापासून ते हर्मन बावेजापर्यंत अनेक लोकांच्या नावाच समावेश आहे. मात्र, या अभिनेत्रीने लग्न केले नाही. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिताला राकेश बापटवर प्रेम झाले होते. परंतु या दोघांचे काही जुळू शकले नाही. ४२ वर्षी शमिता शेट्टी सहसा पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही.

तनिषा मुखर्जी
काजोलची बहीण तनिषा मुखर्जी (Tanisha Mukherji) हिने देखील एकटे राहायचा असा निर्णय घेतला आहे. तिचेही नाव उदय चोप्रा आणि अरमान कोहली याच्याशी जोडले गेले होते. मात्र, तिचे कोणासोबतच जमले नाही. ४३ वर्षीय ही अभिनेत्रीही सिंगल आहे आणि तिचे आनंदमयी जीवन जगत आहेत.

अमिषा पटेल
अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) हिने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांना डेट केले आहे. तिचे नाव देखील अनेक कलाकारांची जोडले गेले होते. मात्र, ४५ वर्षीय तरीदेखील ती सिंगल आहे आणि ती एकटी राहून खूप खुश आहे.

दिव्या दत्ता
अभिनेत्री दिव्या दत्ता (Divya Dutta) हीदेखील सिंगल आहे. तिला तिचे खरे प्रेम मिळाले नाही. परंतु तिने अनेक अभिनेत्यांना डेट केले आहे, पण त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही. ४४ वर्षीय ही अभिनेत्री देखील तिच्या आयुष्यात खूप यशस्वी खुश आहे.

एकता कपूर
चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर (Ekta Kapoor) ही देखील सिंगल आहे. तिने सेरोगेरीद्वारे एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु तिचे लग्न अजून झाले नाही. ४६ वर्षीय एकता एक यशस्वी महिलांपैकी एक आहे.

तब्बू
अभिनेत्री तब्बू (Tabu) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजदेखील ती बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तब्बूला देखील तिचा ‘परफेक्ट मॅन’ मिळालेला नाही.

त्यामुळे ५१ वर्षीय तब्बू अद्याप सिंगल आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!