नादच खुळा! क्रिती सेननच्या करिअरसाठी २०२२ वर्ष ठरणार टर्निंग पॉईंट, ‘या’ पाच चित्रपटांवर लावलीय बाजी


बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननकडे एकापेक्षा एक चित्रपटांचा भरणा आहे. ती लवकरच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये ‘गणपत, ‘भेडिया’, ‘शहजादा’, ‘आदिपुरुष’ आणि ’बच्चन पांडे’ या चित्रपटांचा समावेश आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट चांगलेच पसंत केले गेले आहेत. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्यांना खूप पसंती दिली जाते.

गणपत
‘गणपत’ या चित्रपटात ती टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) दिसणार आहे. ती पुन्हा एकदा टायगरसोबत काम करत आहे. याआधी क्रितीने टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती’ या चित्रपटात काम केले होते. खरं तर या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. टायगर श्रॉफ आणि क्रितीचा ‘गणपत’ हा चित्रपट २३ डिसेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

भेडिया
क्रिती अभिनेता वरुण धवनसोबत (Varun Dhawan) ‘भेडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

शहजादा
‘शहजादा’ या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aaryan) क्रितीही दिसणार आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात परेश रावलचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

आदिपुरुष
क्रिती लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत (Prabhas) ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात सैफ अली खानचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

बच्चन पांडे
क्रिती सेनन लवकरच अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात अर्शद वारसीचीही महत्त्वाची भूमिका आहे.

हा चित्रपट ४ मार्च, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. एकूणच २०२२ क्रिती सेननसाठी हे वर्ष तिच्या कारकिर्दीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!