Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच रोहमन शॉलसोबत दिसली सुष्मिता सेन, पार्टीत घालवला एकत्र वेळ

अभिनेत्री सुष्मिता सेनने गेल्या डिसेंबरमध्ये बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. जरी अभिनेत्री म्हणाली की, “आम्ही नेहमीच मित्र राहू.” जेव्हा त्यांचे नाते तुटले तेव्हा बरीच अटकळ होती, त्यामागचे कारण दोघांनाच  माहित आहे. या घटनेला जवळपास एक महिना झाला आहे, आता बातमी आली आहे की, सुष्मिता रोहमनला भेटली आणि दोघांमध्ये चर्चा झाली, दोघांनी एकत्र प्रवास केला.

सुष्मिता सेन रोहमन शॉलसोबत गेली होती पार्टीला

‘आर्या’ सीरिजमधील दमदार अभिनेत्री तिच्या खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आणि संवेदनशील आहे. स्वत:च्या अटींवर आयुष्य जगणाऱ्या सुष्मिताचे (Sushmita Sen) अनेकवेळा नाते तुटले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ब्रेकअपनंतर रोहमन आणि सुष्मिता पहिल्यांदाच भेटले होते. दोघेही एकाच गाडीतून कॉमन फ्रेंडच्या पार्टीला पोहोचले. सुष्मिता जवळपास अर्धा तास रोहमनशी तिच्या बिल्डिंगखाली बोलत राहिली. दोघेही एकमेकांशी अतिशय मैत्रीपूर्ण वागणूक देत होते. दोघे एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी सुष्मिताच्या मुली रेने आणि अलिशासोबत रोहमनचे चांगले बॉन्डिंग आहे. दोघेही रोहमनसोबत खूप मिसळले आहेत.

Sushmita Sen ends relationship with boyfriend Rohman Shawl - Exclusive |  Hindi Movie News - Times of India

 

रोहमनचे रेने-अलिशासोबत आहेत चांगले संबंध 

सुष्मितासोबत २०१८ सालापासून कुटुंबाप्रमाणे राहत असताना रोहमन रेने आणि अलिशा यांच्यात वडिलांसारखे नाते होते. रोहमन आणि सुष्मिताचं नातं पूर्वीसारखं नसते. पण रेनी आणि अलिशाचे नाते अजूनही घट्ट आहे. यावर अभिनेत्रीचाही आक्षेप नाही.

‘ब्रेकअप झाले पण प्रेम बाकी आहे’

डिसेंबर २०२१ मध्ये जेव्हा अभिनेत्रीने तिच्या विभक्त झाल्याची बातमी सांगितली तेव्हा सुष्मिताचे चाहते आश्चर्यचकित झाले होते. सुष्मिताने लिहिले की, “आमचे नाते मैत्रीपासून सुरू झाले, आम्ही मित्रच राहू. हे नाते संपुष्टात येतंय पण प्रेम कायम आहे.”

Rohman Shawl: Everything in my life changed after I met Sushmita Sen |  Hindi Movie News - Times of India

सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यावर चाहत्यांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक केले. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने सांगितले की, तिला सौहार्दपूर्ण मार्गाने निरोप घ्यायचा होता कारण प्रत्येक नात्याने तिला पुढे जाण्यासाठी मदत केली आहे आणि शक्ती दिली आहे. जगाला अशा प्रेमाची गरज आहे, येथे आधीच अनेक समस्या आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा