Tuesday, May 28, 2024

‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये इंटिमेट सीन दिल्याबद्दल अभिनेत्रीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘मी घाबरायचे आणि…’

‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या लूक आणि स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते. साऊथ आणि बॉलिवूडमध्ये तिचे खूप फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर सुद्धा तमन्नाचे लाखो फॉलोवर्स आहेत. तमन्ना नेहमीच तिच्या लुक्सवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. ती विविध लूकमुळे सतत चर्चेत येते. ती बऱ्याचदा तिच्या फोटोमुळे ट्रोलरच्या निशाण्यावर येते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते. यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

तमन्ना भाटिया ( Tamannaah Bhatia )सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. प्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्या दोघांचा ‘लस्ट स्टोरीज 2’ OTT वर रिलीज झाला आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.

त्यामध्ये तमन्नाने तिची 18 वर्षांची नो-किसिंग आणि इंटिमेट सीन पॉलिसीही मोडली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात तमन्ना पहिल्यांदाच बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत रोमान्स करताना दिसत आहे. तमन्नाने तिच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आव्हान केले होते. त्याचवेळी विजय वर्माने ‘लस्ट स्टोरीज 2’ कुटुंबासोबत पाहण्याची विनंती केली होती. या सगळ्यानंतर आता तमन्ना भाटियाने भाष्य केले आहे.

तमन्ना भाटिया म्हणाली कि, “मी एक प्रेक्षक म्हणुन कुटुंबासोबत बसून हा चित्रपट पाहिला. पण तेव्हा मला खूप काहीतरी विचित्र वाटत होत. मी इकडे तिकडे बघायला लागले. तेव्हा मी खूप घाबरायचे आणि अस्वस्थ व्हायचे. बऱ्याच दिवसांपासून मी माझ्या चित्रपटांमध्ये कोणतेही इंटिमेट सीन केले नाहीत.”

ती पुढे बोलताना म्हणाली की, “हे सगळ माझ्यासाठी प्रेक्षकांच्या गरजा पूर्ण करणारी अभिनेत्री बनण्याचा प्रवास होता. आतापर्यंतचा प्रवास अंधुक होता. माझा हा भ्रम तुटला आहे. म्हणूनच मी एक कलाकार म्हणून स्वत:चा शोध घेत आहे आणि वेगवेगळ्या भूमिका साकारून माझ्या कामाचा आनंद घेत आहे.” या चित्रपटामध्ये काजोल, नीना गुप्ता, मृणाल ठाकूर, कुमुद मिश्रा, अमृता सुभाष आणि अंगद बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Actress Tamannaah Bhatia gave her first reaction to giving an intimate scene in ‘Lust Stories 2’)

अधिक वाचा- 
समुद्र किनाऱ्यावरील आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नीना गुप्ता म्हणाल्या…
‘चंद्रमुखी 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज; कंगना रणौतची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा