Thursday, June 13, 2024

वयाने 39 वर्षे मोठ्या रजनीकांत यांची हिरोईन बनण्यावर तमन्नाचे विधान; म्हणाली, ‘मी तर 60व्या वयातही…’

सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांच्या वयातील अंतर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. कमी वयाच्या अभिनेत्री नेहमी वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यांसोबत काम करताना दिसतात. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. 33 वर्षीय तमन्ना भाटिया ‘जेलर’ या आगामी सिनेमात 72 वर्षीय रजनीकांत यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. त्यांच्यात तब्बल 39 वर्षांचे अंतर आहे. अशात ‘तू आ दिलबरा’ या गाण्याच्या लाँचिंगदरम्यान तिला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तमन्ना भाटियाने वयातील अंतराविषयी भाष्य केले.

काय म्हणाले तमन्ना?
वयातील अंतराच्या प्रश्नाचे उत्तर देताना तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) म्हणाले की, “मी फक्त एवढंच म्हणेल की, तुम्ही वयातील अंतर का पाहत आहात? तुम्हाला स्क्रीनवर साकारले जाणारे दोन पात्र पाहावे लागतील.”

तमन्ना भाटिया हिने हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ (Tom Cruise) याचे उदाहरण दिले. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत क्रूझने अनेक ऍक्शन सिनेमात काम केले आहे. तसेच, प्रत्येक ऍक्शन सीन करण्यासाठी त्याने कधीच स्टंट डबलचा वापरही केला नाहीये. तमन्ना म्हणाली की, “जर मला वयाबाबत भाष्य करायचे आहे, तर मी 60 वर्षांच्या वयातही टॉम क्रूझचे स्टंट पाहील. मला त्या वयातही आयटम डान्स नंबर करायला आवडेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

तमन्नाचे आगामी सिनेमे
तमन्ना अलीकडेच ‘जी करदा’ वेबसीरिज आणि ‘लस्ट स्टोरीज 2’ या सिनेमात झळकली होती. दोन्ही सिनेमात तिने बोल्ड आणि लव्हमेकिंग सीन्स दिले होते. त्यामुळे तिच्यावर कडाडून टीकाही झाली होती. अशात यानंतर आता ‘जेलर’ सिनेमानंतर तमन्ना भाटिया 67 वर्षीय चिरंजीवी यांच्यासोबत ‘भोला शंकर’ या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

याव्यतिरिक्त तमन्नाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं, तर ती तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत आहे. ती अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) याला डेट करत आहे. दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसतात. दोघांनीही हे मान्य केले आहे की, ते एकमेकांना डेट करत असून खुश आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत तमन्नाने विजयला आपल्या खऱ्या आयुष्यातील हिरो म्हटले आहे. तसेच, विजय म्हणाला होता की, त्याचे आयुष्य सध्या प्रेमाने भरले आहे.

विशेष म्हणजे, ‘लस्ट स्टोरीज 2’ सिनेमात तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या मुख्य भूमिका होत्या. (actress tamannaah bhatia reacts on working with rajnikanth who is 39 years older than her)

हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! मराठी दिग्दर्शकाची आत्म’हत्या, चित्रपटसृष्टीवर शोककळा
‘शेतीच्या कामाला बैल, कष्टाच्या कामाला गाढव आणि विकासाच्या कामाला *** लागतो’, सयाजी शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा