Thursday, June 13, 2024

तमन्ना भाटिया ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला करतेय डेट? व्हायरल झाले स्टायलिश फाेटाे

प्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. असे असूनही दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. 2023 नवीन वर्ष सुरू होत असताना, गोव्यात एका न्यू इयर पार्टीमध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसले. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या बातम्या रंगू लागल्या.

विजय वर्मा (vijay verma) हा बॉलिवूडमधील उगवत्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर तमन्ना भाटिया देखील तिच्या कामामुळे खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच विजय वर्मा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना दिसला होता. या साेबतच त्याची नुकतीच रिलीज झालेली दहाड’ ही वेबसिरीज खूप पसंत केली जात आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशात शुक्रवारी (दि. 2 जुन)ला दोघेही डिनर डेटनंतर स्पॉट झाले होते, ज्याचे फाेटाे पॅपराझींने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, दोघेही काळ्या आऊटमध्ये दिसत असून विजय वर्माने काळ्या रंगाचा ब्लेझर घातलेला आहे. त्याचबरोबर त्याने फिकट रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातली आहे, तर तमन्ना भाटियानेही ब्लॅक ट्यूब टॉप आणि ब्लेझर घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

तमन्ना भाटियाविषयी बाेलायचे झाले, तर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, ‘बाहुबली’ या चित्रपटातून ती खूप प्रसिद्ध झाली. तमन्ना हिचा साेशल मीडियावर माेठा चाहता वर्ग देखील आहे. अशात अभिनेत्री कायमच फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते.(bollywood actress tamannaah bhatia and vijay verma spotted together on a dinner date seen in stylish black outfits photos goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इश्क का रंग सफेद! साराचे प्रेमात पाडणारे फोटोशूट, एकदा पाहाच
बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा

हे देखील वाचा