बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी आलिया खूपच कूल आणि चिल लूकमध्ये हाेती. अभिनेत्रीने मल्टी कलर वूलन क्रॉप टॉप घातला होता, ज्यामध्ये ती एका बार्बी गर्लसारखी दिसत होती. अशात आलिया कारमधून बाहेर पडताच पॅपराझींनी तिला ‘सीता’ म्हटले. यावर अभिनेत्री लाजली आणि चेहरा लपवू लागली. अशात आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खरं तर, अलीकडेच आलिया भट्ट (alia bhatt) लवकरच साउथमधील एका पॅन इंडिया चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यासाेबतच चित्रपटात भगवान रामची भूमिका अभिनेत्रीचा पती रणबीर कपूर साकारणार असल्याचे सांगण्यात आले हाेते. या बातमीनंतर चाहतेही आलिया आणि रणबीरला राम-सीतेच्या जोडीच्या रुपात पाहू लागले. याच कारणामुळे पापाराझींनी आलियाला सीता म्हणून संबोधले, ज्यावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
याशिवाय आलियाने तिच्या या लूकचे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटात लवकरच दिसणार आहे. यामध्ये आलिया हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गॅडॉट आणि जेमी डोरनसाेबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. टॉम हार्पर दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. यासाेबतच आलिया करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासाेबत रणवीर सिंग देखील दिसणार आहे. अशात हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रदर्शित हाेणार आहे.(bolllywood actress alia bhatt hides her face when paparazzi call her sita watch video)
अधिक वाचा-
–डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल
–‘बहरला हा मधुमास’ गाण्याची अनुपमाला पडली भुरळ, ‘गुरु माँ’साेबत दिसली ठुमके लावताना