Sunday, December 3, 2023

राखीला खावी लागणारा तुरुंगाची हवा? ‘या’ अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावरही केले गंभीर आरोप

काही वर्षांपूर्वी ‘मी टू’ चळवळीमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तनुश्रीने अलीकडेच आदिल खान दुर्रानीच्या समर्थनार्थ समोर येत राखीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर आता तनुश्री दत्ता राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत यांच्यातील वादात आता नवीन वळण आले आहे. तनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तनुश्रीने राखी सावंतवर मानसिक छळ, बदनामी आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच तनुश्रीने नाना पाटेकरांवरही खरपूस समाचार घेतला आहे.

तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta)  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “मी इथे राखी सावंतविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी आले आहे. 2018 मध्ये मी टू चळवळीदरम्यान तिने मला खूप त्रास दिला होता. आता पोलिसांनी अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. तिने पाच वर्षांचे सर्व स्टेटमेंट आणि पुरावे गोळा केले आहेत. या सर्व व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक लहान-मोठी गोष्ट तिने पोलिसांना सांगितली आहे. पोलीस कडक कारवाई करतील याची मला खात्री आहे.”

तनुश्रीने सांगितले की, “हे संपूर्ण प्रकरण 2008 चे आहे, जेव्हा निर्मात्यांनी राखी सावंतला हॉर्न ओके प्लीज चित्रपटातील एका गाण्यातून काढून टाकल्यानंतर तिला साइन केले होते. पण हे बघून राखी सावंतने वाद निर्माण केला. त्यानंतर निर्मात्यानेही तिला काढून राखी सावंतला परत घेतले. निर्माता आणि राखी यांनी मिळून हा प्रहसन रचल्यामुळे हे सर्व नाटक जाणूनबुजून तिच्याविरोधात करण्यात आल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. पण तो चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही.”

राखी सावंतने तिच्यावर अनेकदा मानसिक छळ केला आहे. राखीने तिच्याविषयी खोटे आणि बदनामीकारक आरोप केले आहेत. त्यामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. तसेच, राखीने तिला चित्रपटातून काढून टाकण्यासाठी आणि तिच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यापूर्वी, तनुश्री दत्ता आणि राखी सावंत यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. 2018 मध्ये, तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर सेटवर तिला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, राखी सावंतने तनुश्री दत्तावर नाना पाटेकरला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

तनुश्री दत्तानेही तिच्या संभाषणात नाना पाटेकर यांचा उल्लेख करत त्यांना देखील टोमणा मारला आहे.ती म्हणली की, ‘नाना पाटेकरांनी स्वतःची अशी प्रतिमा निर्माण केली आहे की, ते समाजाची सेवा करतात. मात्र ते केवळ पत्रकार परिषदेत समाजसेवेबद्दल बोलतात आणि पुरावे कधीच दाखवत नाहीत. चांगला माणूस तोच असतो जो आपल्या कुटुंबासोबत राहतो.” तनुश्री दत्ता आणि राखी सावंत यांच्यातील हा वाद आता कायदेशीर मार्गावर आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. (Actress Tanushree Dutta filed a complaint against Rakhi Sawat and made serious allegations against Nana Patekar)

आधिक वाचा-
जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा ‘हा’ आहे हिंदी चित्रपट, केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई
‘एखादा पोलीस कितीही भ्रष्टाचारी असला तरी…’, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा