Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड ‘राखी सावंत कधीच बनू शकत नाही आई’, आदिलच्या दाव्याची अभिनेत्रीने पुराव्यासकट खोलली पोल; वाचा

‘राखी सावंत कधीच बनू शकत नाही आई’, आदिलच्या दाव्याची अभिनेत्रीने पुराव्यासकट खोलली पोल; वाचा

बॉलिवूडच्या प्रसिद्धी पिपासू कलाकारांमध्ये अभिनेत्री राखी सावंत हिच्या नावाचाही समावेश होतो. ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली राखी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशात आता तिचा एक्स पती आदिल दुर्रानी तुरुंगातून बाहेर आला आहे. तसेच, त्याने बाहेर येताच राखीवर गंभीर आरोपही केले आहेत. आदिलने अभिनेत्रीवर खोटी प्रेग्नंसी आणि गर्भपाताचे ढोंग केल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही, तर तो असेही म्हणाला आहे की, राखीने तिचे गर्भाशय काढले आहे, त्यामुळे ती आई बनू शकत नाही. अशात आता राखी सावंतने आपला बचाव करत आदिलचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

गर्भाशय काढल्याचे राखीने फेटाळले
खरं तर, राखी सावंत (Rakhi Sawant) हिने स्त्रीरोगतज्ज्ञाच्या क्लिनिकबाहेरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. राखी सावंत व्हिडिओत भावूक होऊन सांगत आहे की, “देव प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही, पण देवाने डॉक्टरांना बनवले आहे. जेणेकरून आमच्यासारखे पीडित चांगले आयुष्य जगू शकतील.”

आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्याविषयी राखी पुढे बोलताना म्हणाली की, “काही काळापूर्वी माझ्या गर्भाशयाचे ऑपरेशन झाले होते. आदिलसोबत लग्न करून मला बाळ हवे होते, पण मी वेळेपूर्वीच बाळाला जन्म दिला असता, तर माझ्या गर्भाशयात फायब्रॉईड झाले असते. त्यामुळे आज मी माझ्या डॉक्टरांकडे आली आहे, ज्यांनी माझ्या फायब्रॉईडचे ऑपरेशन केले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Waahiid Ali Khan (@sshaawntv)

‘राखी बनू शकते आई’
यानंतर राखीने आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे कॅमेरा फिरवला. त्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितले की, “राखी आई बनू शकते. राखीच्या गर्भाशयात खूप फायब्रॉईड्स होते, जे काढून टाकले आहेत. आता ती पूर्णपणे ठीक आहे. तिला मासिक पाळीही व्यवस्थित येत आहे. चिंतेची कोणतीही बाब नाहीये. त्यामुळे ती आई बनू शकते.” यावेळी डॉक्टरांनी राखीच्या गर्भाशय काढण्याच्या चर्चाही फेटाळल्या.

‘आदिल करतोय बदनामी’
यानंतर राखी म्हणते की, “आदिल सर्व जगाला सांगत आहे की, मी आई बनू शकत नाहीये.” यावर डॉक्टर म्हणतात की, “राखी आई बनू शकते.” त्यानंतर राखी म्हणते की, “मी माझी अंडी डॉक्टरांकडे गोठवली आहेत. तसेच, त्यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की, मी देखील आई बनू शकते, त्यामुळे हा आदिल संपूर्ण जगात माझी बदनामी करत आहे.”

राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊसही पडत आहे. (drama queen rakhi sawant share her gynecologist video and rejected adil durrani claim)

महत्त्वाच्या बातम्या-
‘रॉकी और रानी…’ सिनेमाच्या यशाबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘रिलीजपूर्वी येत होते…’
काळीज तोडणारी बातमी! 40 वर्षीय गायकाच्या 3 मुली झाल्या पोरक्या, संगीतविश्वावर शोककळा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा