‘लिमिट क्रॉस केली, तर मी पण मागे हटणाऱ्यांपैकी नाही’, ट्रोलर्सना ‘उतरण’ फेम अभिनेत्रीचे खणखणीत प्रत्युत्तर


टेलिव्हिजनवरील ‘उतरण’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे टिना दत्ता. तिने या मालिकेत एका सरळ साध्या ‘इच्छा’ या मुलीचे पात्र निभावले होते. असे असले, तरीही ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच बोल्ड आणि हॉट आहे. ती सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोमुळे खूप ट्रोल होत असते. (Actress Tina Datta give answer to trollers)

टिनाने नुकतेच तिचे एक बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. युजर्सनी तिच्या या फोटोवर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यावर टिना दत्ताची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिने एका मुलाखतीत ट्रोल करणाऱ्या लोकांना सक्त ताकीद देत सांगितले की, ती शांत बसणाऱ्या मुलींपैकी नाही.

फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत टिनाला जेव्हा या फोटोवर आलेल्या कमेंटबाबत विचारले, तेव्हा तिने सांगितले की, “मी ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी माझ्या अंदाजात उत्तर देणार आहे.”

जेव्हा टिनाला विचारले की, या सगळ्या ट्रोलिंगचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर काही परिणाम होतो का? यावर तिने “हो” असे उत्तर दिले. तसेच ट्रोलर्सला चेतावणी देऊन सांगितले की, “जर ते त्यांच्या मर्यादा पार करत असतील, तर मीही मागे सरणाऱ्या व्यक्तींपैकी नाहीये. परंतु आता जेव्हा ते त्यांच्या मर्यादेत राहतात, तेव्हा मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. कारण लोकांना गप्प करण्यासाठी, गप्प राहणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.”

तिने पुढे सांगितले की, “इंटरनेट हे आजकाल प्रत्येकासाठी एक नो- फेस स्पेस बनला आहे. यामुळेच प्रत्येकजण त्याला हवे ते बोलू शकतो. त्यामुळे ही अशी गोष्ट आहे ज्यांचे ते (ट्रोलर्स) हकदार आहेत.” तिने सांगितले की, “अनेकवेळा हे असे होते. लोकांना असे वाटते की, सोशल मीडियावर एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहे, जिथे त्यांना ते हवे तितक्या खालच्या पातळीला जाऊन बोलू शकतात. हे त्यामुळे होते कारण प्रोफाईलवर ना कोणाचा फोटो असतो, ना कोणाचे नाव. त्यांची तक्रार करण्यासाठी कोणताच पुरावा नसतो. अशाप्रकारे लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फायदा घेतात.”

नुकतेच काही दिवसांपूर्वी टिनाने तिचे एक टॉपलेस फोटो शूट केले होते. यामध्ये ती ग्लॅमरस दिसत होती. तिच्या या फोटोला देखील प्रेक्षकांनी खूप ट्रोल केले होते. एवढंच काय पण सोशल मीडियावर प्रेक्षक मर्यादा पार करून या फोटोवर कमेंट करू होते. यावर टिना दत्ता गप्प बसली नव्हती. तिने देखील प्रेक्षकांना असे उत्तर दिले की, त्यांची बोलती बंद झाली होती. टिनाने सांगितले की, यानंतर एका युजरने तिला सॉरी म्हणले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो

-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती


Leave A Reply

Your email address will not be published.