Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये दिसणार तृप्ती दिमरी ! रोल ठरू शकतो पाथ ब्रेकिंग…

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये दिसणार तृप्ती दिमरी ! रोल ठरू शकतो पाथ ब्रेकिंग…

 ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर तृप्ती दिमरीची प्रसिद्धी वाढली आहे. नुकतीच ती ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात दिसली होती. याशिवाय आगामी काळात तृप्ती ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे इतरही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आहेत. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जात आहे की तृप्तीच्या हाती एक बायोपिक आला आहे. हा बायोपिकही एके काळच्या एका दिग्गज अभिनेत्रीचा आहे.

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, तृप्ती दिमरी परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या भूमिकेसाठी ती एक प्रबळ दावेदार मानली जातेय. मात्र, अद्याप काहीही अधिकृत झालेलं नाही. यापूर्वी ही भूमिका साकारण्यासाठी उर्वशी रौतेलाचे नाव पुढे येत होते. पण आता चर्चा तृप्तीच्या नावाची आहे.

परवीन बाबीच्या बायोपिकची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. लेखिका करिश्मा उपाध्याय यांनी लिहिलेले ‘परवीन बाबी: अ लाइफ’ हे त्यांचे चरित्र अनेक वर्षांपासून लोकांना मानसिक आरोग्याविषयी बोलतं करण्यासाठी प्रेरित करत आहे, आता या पुस्तकावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू झाली आहे आहे. परवीन बाबी ७० आणि ८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी दीवार, अमर अकबर अँथनी, मजबूर, त्रिमूर्ती आणि खट्टा मीठा यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेत्री तृप्तीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘पोस्टर बॉईज’मधून पदार्पण केले. त्यानंतर ती बुलबुल आणि कला यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, ‘ॲनिमल’ नंतर तीची लोकप्रियता अधिक वाढली. आता ती कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, याशिवाय राजकुमार रावचा “विकी विद्या का व्हिडिओ” देखील तृप्तीचा आगामी चित्रपट आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

कमी उंचीमुळे अनेकांनी मला त्रास दिला ! बिग बॉसच्या घरात छोटा पुढारी भावूक …

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा