Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन कमी उंचीमुळे अनेकांनी मला त्रास दिला ! बिग बॉसच्या घरात छोटा पुढारी भावूक …

कमी उंचीमुळे अनेकांनी मला त्रास दिला ! बिग बॉसच्या घरात छोटा पुढारी भावूक …

बिग बॉसचा दुसरा आठवडा मध्यावर आला आहे. यंदाचा सिझन देखील नेहमीप्रमाणे आगळावेगळा ठरला आहे. दमदार वक्तृत्त्वाने अनेकांना घाम फोडणारा छोटा पुढारी देखील यंदा सहभागी आहेत. आपल्या कमी उंचीमुळे अनेकांना हिणवल्याचा त्याचा अनुभव त्याने यावेळी शेयर केला आहे. 

बिग बॉसच्या घरातून एक व्हीडीओ समोर आला आहे.यामध्ये छोटा पुढारी धनंजय दादा सोबत गार्डन मध्ये बसून बोलताना दिसत आहे. धनंजयशी बोलताना तो भावूक झालेला बघायला मिळत आहे. कमी उंची असल्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अनेक संकटांना पार करत पुढे यावं लागलं आहे. याशिवाय समाजातील काही घटकांनी त्यांना त्रास देखील दिला असल्याचं तो धनंजय दादांना म्हणाला. 

माझ्या घरच्यांना म्हणायचे की तुमचा मुलगा काही करू शकणार नाही. तो उंच नाही. आज तेच लोक म्हणत असतील. की यांचा मुलगा बिग बॉस मध्ये गेलाय. हे सगळं बोलत असताना त्याच्या डोळ्यात अश्रू देखील आले. त्याला आधार देत धनंजय म्हणतो, ज्याला शरीराची उंची मापता आली नाही. त्याला मनाची उंची काय मापता येणार !

या दुसऱ्या आठवड्यात घरातलं पाहिलं कॅप्टन्सी कार्य पार पडलं आहे. यात अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घरातील यंदाच्या आठवड्याची कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आली आहे. पण अंकिता कॅप्टन होताच छोटा पुढारीने घरातील काम करण्यास नकार दिला आहे. आता पुढे काय होणार हे बघावं लागेल.   

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

कुशलला सलतंय जोडीदार गमावण्याचं दुःख ! सोशल मिडीयावर व्यक्त केल्या भावना…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा