Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड पॅपराजी फोटो काढायला येताच रिक्षाचालकावर भडकली ट्विंकल खन्ना, व्हिडिओत कैद झाली रिऍक्शन

पॅपराजी फोटो काढायला येताच रिक्षाचालकावर भडकली ट्विंकल खन्ना, व्हिडिओत कैद झाली रिऍक्शन

बी टाऊनमधील काही मायलेकींच्या जोड्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन तसेच, ट्विंकल खन्ना आणि नितारा यांच्या नावाचा समावेश होतो. ऐश्वर्या आराध्या नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. तिच्यानंतर आता ट्विंकल आणि आराध्या या चर्चेचा विषय ठरत आहे. यामागील कारण आहे त्यांचा एक व्हिडिओ, जो सध्या भलताच व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काय आहे त्या व्हिडिओत…

अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि नितारा (Twinkle Khanna And Nitara) या मायलेकींचा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) तिची मुलगी नितारा (Nitara) हिच्यासोबत रिक्षामधून कुठेतरी जात होती. त्यावेळी तिथे पॅपराजी आले आणि त्यांचे फोटो काढू लागले. हे निताराला आवडत नव्हते. ती काहीतरी बोलताच ट्विंकल तिला म्हणते की, “खूप चांगले झाले.”

मात्र, ट्विंकल आणि नितारा हे रिक्षामध्ये बसल्यानंतरही चालकाने रिक्षा सुरू केली नव्हती. अशात पॅपराजी सातत्याने त्यांचे फोटो काढत होते. मात्र, ट्विंकलला हे आवडले नाही. तिने चालकाला ओरडत म्हटले की, “चला भैय्या तुम्ही का थांबला आहात?” यानंतर ती जोरात हसू लागते आणि तिला पाहून निताराही हसू लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी ट्विंकलने रंगीत आऊटफिट परिधान केला होता. तिने सोनेरी रंगाच्या सँडलसोबत तिचा लूक पूर्ण केला होता. दुसरीकडे, नितारा जांभळ्या रंगाच्या टॉप, शॉर्ट्स आणि स्नीकर्समध्ये दिसली. ट्विंकलसोबत एक बॅग आणि एक पुस्तकही होते, तर निताराच्या हातात एक पाऊच होता.

अक्षय कुमार आणि ट्विंकलची छोटी मुलगी आहे नितारा
खरं तर, नितारा ही अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना छोटी मुलगी आहे. त्यांना एक मोठा मुलगाही आहे. त्याचे नाव आरव आहे. अक्षयचीदेखील ट्विंकलप्रमाण मुलांसोबत चांगली बाँडिंग आहे. अक्षय हा सिनेमात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे, तर ट्विंकलने अभिनयाला रामराम ठोकला असून ती एक लेखिका बनली आहे. तिने अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात ‘मिसेस फनीबोन्स’, ‘पजामा आर फॉरगिव्हिंग’ आणि ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’ यांसारख्या पुस्तकांचा समावेश आहे. (actress twinkle khanna nitara auto ride video as she reacts on paparazi for photo)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अभिमानास्पद! रितेश देशमुखच्या सिनेमाने प्रेक्षकांना लावले ‘वेड, केली बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई
जेव्हा हॉटेलचा कर्मचारी झाला स्मिता गोंदकरचा फोटोग्राफर, तेव्हा निघाला ‘असा’ जबराट फोटो

हे देखील वाचा