Thursday, June 13, 2024

उर्फीची लिमिट क्रॉस! ड्रेसवरून चिडणाऱ्या वयस्कर व्यक्तीला म्हणाली, ‘तुमच्या बापाचं…’

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने मागील काही काळात आपल्या जगावेगळ्या फॅशन स्टाईलने आणि नवनव्या प्रयोगाने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला अनेकदा यासाठी ट्रोल केले जाते. काही वेळा ती, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते, पण ती कुणालाच प्रत्युत्तर देण्यास घाबरत नाही. तिने अनेकदा टीकाकारांची बोलती बंद केली आहे. अशात आता उर्फी पुन्हा एकदा रागावल्याचे दिसत आहे.

उर्फी जावेदचा व्हिडिओ व्हायरल
उर्फी जावेद (Urfi Javed) नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी विमानतळावर तिला एक व्यक्ती भेटला, ज्याने सर्वांसमोर तिला झाप झाप झापले. तो व्यक्ती उर्फीला तिच्या कपड्यांवरून रागावताना दिसला. मात्र, उर्फीनेही त्या व्यक्तीवर आपला राग काढला.

सोशल मीडियावर उर्फीचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती हिरव्या रंगाच्या बॅकलेस कॉटन मॅक्सी ड्रेसमध्ये विमानतळाच्या आत दिसत आहे. ज्यावेळी पॅपराजी उर्फीचे फोटो काढत असतात, तेव्हाच एक व्यक्ती आपल्या दोन्ही हातांमध्ये स्टीलचे ग्लास घेऊन दिसतो. तो तिथून जात असतो, तेव्हाच तो उर्फीला पाहून म्हणतो की, “भारतात असे नाही, आमचे नाव खराब होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यावर उर्फी माघारी फिरते आणि म्हणते की, “तुमच्या बापाचं काय जातंय? नाही जात ना तुमच्या बापाचं काही, मग जावा काम करा.” यानंतर उर्फीची मॅनेजर मध्यस्थी करते आणि उर्फीला पुढे जाण्यास सांगते. यादरम्यान उर्फीचा मूड खूपच खराब असल्याचे दिसते.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी उर्फीवर राग व्यक्त केला आहे. एकाने म्हटले आहे की, “कमीत कमी काकांच्या वयाचा तरी आदर करायचा. बरोबरच बोलत आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तुझ्या वडिलांच्या वयाचे आहेत.” आणखी एकाने लिहिले की, “बरं झालं झापलं.”

या व्हिडिओला आतापर्यंत 38 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 1 लाखांहून अधिक लाईक्सचाही पाऊस पडला आहे. (actress uorfi javed blast over a man commented furiously on her clothes watch see video)

महत्त्वाच्या बातम्या-
तमन्नाला कुणी दिला जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा? आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी
One Friday Night: रवीनाच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलचा भडीमार; तुम्हीही पाहाच

हे देखील वाचा