याला म्हणतात विषय खोल! खेसारी-काजलच्या गाण्याने तोडले सगळे विक्रम, २६ कोटी हिट्स आले पहिल्या क्रमांकावर


अनेक गाणे, अल्बम प्रदर्शित झाल्यानंतर पुढचे काही काळ खूप चर्चेत असतात. हिट होतात, मात्र जसा वेळ जातो, तसा प्रेक्षकांना त्या गाण्याचा विसर पडतो आणि ते गाणे मागे पडत जाते. मात्र काही गाणे असं आहेत, जे प्रदर्शित होऊन अनेक महिने उलटले तरी त्यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नसते. याउलट वेळेनुसार ती लोकप्रियता अधिकच वाढत जाते. याच विभागात मोडणारे एक गाणे सध्या खूपच चर्चेचा विषय ठरत आहे.

हे गाणे आहे भोजपुरी भाषेतील खेसारी लाल आणि काजल राघवानी यांचे ‘पागल बनाईबे’. दोन वर्षांपूर्वी यूटुबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आजही फॅन्सचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसांपासून खेसारी लाल आणि काजल राघवानी या दोघांमध्ये वाद सुरु आहेl. या दोघांनी एकमेकांसोबत काम करणे बंद केले असून, एकमेकांशी बोलणे देखील त्यांनी बंद केले आहे. काजलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, खेसारीने तिला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

मात्र असे असूनही, काजल आणि खेसारी यांच्या फॅन्सला त्या दोघांना पुन्हा सोबत बघण्याची खूप इच्छा आहे, मात्र अजूनतरी ही गोष्ट शक्य वाटत नाहीये, त्यासाठी फॅन्स त्यांच्या जुन्या गाण्यांना पाहूनच आपली इच्छा काही प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

खेसारी लाल आणि काजल राघवानी यांच्या ‘पागल बनाईबे’ या गाण्याला खेसारी लाल आणि प्रियांका सिंग यांनी गायिले असून या गाण्यातून या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे. या गाण्यातल्या काजलचा धमाकेदार डान्स देखील फॅन्सला आकर्षित करत आहे. या गाण्याचे शब्द आझाद सिंग यांनी लिहिले आहे तर गाण्याला संगीत धनंजय मिश्रा यांनी दिले आहे.

‘पागल बनाईबे’ के गाणे ‘दबंग सरकार’ या सिनेमातील आयटम सॉन्ग आहे. या गाण्याला योगेश राज मिश्रा यांनी दिग्दर्शित केले आहे. या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यन्त २६ करोड व्युज मिळाले असून, ४७ हजार लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.