Tuesday, June 25, 2024

उर्फी जावेदचा अल्युमिनियम फॉइलचा विचित्र ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी म्हटले, ‘स्वस्तातली रिहाना’

बिग बॉस ओटीटीमध्ये दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल ती तिच्या अभिनयासाठी कमी आणि तिच्या विचित्र कपड्यांसाठी जास्त ओळखली जात आहे. आपल्या आउटफिट्समुळे चर्चेत असलेल्या उर्फीने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने केंडल जेनर आणि बेला हदीद सारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची कॉपी केली होती. आता पॉप स्टार रिहानाची देखील कॉपी तिने केली आहे. उर्फीने यावेळी रिहानाचा मेट गालामधील लूक कॉपी केला असून, फरक एवढाच आहे की, उर्फीने तिचे आउटफिट अधिक लक्षवेधी बनवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला आहे.

उर्फीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा ड्रेस परिधान केला आहे. एवढेच नाही, तर तिने रिहानाप्रमाणे डोक्यावर मुकुटही घातला आहे. या ड्रेसमध्ये उर्फी पूर्ण आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली. उर्फीने या नवीन आऊटफिटमध्ये ग्लॅमरस दिसण्याचा खूप प्रयत्न केला असला तरी, नेटकऱ्यांनी तिला स्वस्तातील रिहाना म्हटले आहे. या व्हिडिओवर चाहते तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

एका युजरने लिहिले की, “स्विगी, झोमॅटोकडून जेव्हा आपण जेवण मागवतो तेव्हा यात चपाती गुंडाळून येते.” दुसर्‍याने लिहिले की, “स्वस्त मेट गाला लूक”, एकाने लिहिले की, “मूर्ख स्त्री ते फॉइल पेपर आहे.” आणखी एका युजरने लिहिले की, “राखी सावंत दुसरी, आता राखी साधी झाली आहे आणि तिची जागा घ्यायला ही आली आहे.” अजून एकाने लिहिले की, “आलू पराठा दिसत आहे.” अशीच उर्फीची अनेकांनी खिल्ली उडवली आहे.

यापूर्वी, उर्फीने बेला हदीदचा सी-थ्रू ड्रेस आणि केंडल जेनरच्या ब्लॅक कट-आउट ड्रेसची कॉपी केली होती. ट्रोलिंगवर उर्फीने सांगितले होते की, “लोकांना मला ट्रोल करायला हरकत नाही.” तिने अगदी स्पष्टपणे केंडल जेनरची कॉपी केली असल्यास नकार दिला होता. उर्फी म्हणाली होती, “ज्या दिवशी केंडल जेनरने तो ड्रेस घातला होता, मी दुसऱ्या दिवशी तोच ड्रेस घातला होता, तेच कपडे एका दिवसात कसे तयार होऊ शकतात.”

तिच्या बचावात तिने असेही म्हटले की, लोक तिला काळ्या कट-आउट ड्रेसमध्ये केंडल जेनरपेक्षा चांगले म्हणत आहेत. केंडल आणि बेलासारख्या सेलिब्रिटींशी स्वतःची तुलना करताना उर्फीला कमी वाटली. म्हणून तिने आता रिहानाची कॉपी केली आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये डस्टबिनच्या पिशव्यांपासून कपडे बनवून तिने ते घातले होते. एका टास्कदरम्यान तिची फॅशन दाखवताना ती अंगावर काळे प्लास्टिक गुंडाळताना दिसली. त्यावेळी तिच्या टॅलेंटचे अनेकांनी कौतुक केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा