Monday, June 9, 2025
Home अन्य अभिनेत्री उर्फी जावेदला सतावतेय ‘परवा’ची चिंता; म्हणाली, ‘घरात पीठ कसे येईल?’

अभिनेत्री उर्फी जावेदला सतावतेय ‘परवा’ची चिंता; म्हणाली, ‘घरात पीठ कसे येईल?’

फॅशनिस्टा उर्फी ​​जावेद (Urfi Javed) तिच्या असामान्य फॅशनमुळे सतत प्रकाश झोतात राहते. ती सतत नवनवीन फॅशनेबल कपड्यांमधील फोटो शअर करत, तिचे डिझायनिंग कौशल्य दाखवत असते. पण यावेळी उर्फीने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपल्या बचत योजनेबद्दल एक मजेदार खुलासे केले आहेत.

बचत आहेत, पण परवा पीठ कसे येणार?
उर्फीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका डायलॉगची नक्कल करताना दिसत आहे. ती म्हणते की, “मला उद्याची काळजी नाही… माझ्याकडे तेवढी बचत आहे, मी चिंतेत आहे परवासाठी…त्या दिवशी घरात पीठ कसे येणार?” फॅशनची राणी बनलेली उर्फी विनोदाच्या बाबतीतही प्रतिभावान आहे. परफेक्ट फेस एक्सप्रेशनसह तिने लिप टू लिप परफेक्ट मिमिक्री केली आहे. तिच्या या व्हिडिओला १९ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यासह चाहते सतत त्यावर कमेंट्स देखील करत आहेत.

उर्फीची ही पोस्ट नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनकडे बोट दाखवत आहे. दोन दिवसांनंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि संपूर्ण जग त्याच्या तयारीत व्यस्त आहे. मात्र, उर्फीला हे नवीन वर्ष एकटीलाच घालवावे लागणार आहे. तिने एक दिवसापूर्वीच तिच्या पोस्टमध्ये आजारी असल्याची माहिती दिली होती.

उर्फी जावेद आहे आजारी
उर्फीने लिहिले की, “मी सध्या खूप आजारी आहे कदाचित नवीन वर्ष अंथरुणावर घालवावे लागेल. बरं, मलाही असंच काहीतरी हवे होते.” तिने तिच्या साडीच्या लुकसह ही पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांनीही तिच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि ती लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली.

उर्फी जावेद प्रत्येक वेळी आपल्या स्टाईलने चाहत्यांचे होश उडवते. चाहते तिच्या दैनंदिन पोस्टची डोळे उघडे ठेवून आतुरतेने वाट पाहत असतात. बर्‍याच वेळा उर्फी तिच्या स्टायलिश कपड्यांमुळे ट्रोल देखील झाली आहे. मात्र उर्फी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही, तिने ट्रोल करणाऱ्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा