स्टायलिश आऊटफिटच नव्हे, तर साडी लूकमध्येही जबरदस्त दिसते उर्फी जावेद, बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल


‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री उर्फी जावेदचा (Urfi Javed) ग्लॅमरस लूक अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. दरवेळी ती आगळ्यावेगळ्या हॉट आणि बोल्ड स्टाईलमध्ये दिसते. पण यावेळी उर्फीने पिवळ्या रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमधील तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये उर्फी जावेद प्रिंटेड पिवळ्या साडीत अप्रतिम दिसत आहे. मात्र नेहमीप्रमाणे साडीतही उर्फीचा बोल्ड लूक पाहायला मिळत असल्याने, चाहते फोटोवर प्रेम व्यक्त करत आहेत. (gossips urfi javed saree look viral on social media)

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फी जावेदने केसांचा अंबाडा बांधला आहे. तसेच तिने चेहऱ्यावर हलका मेक-अप केला आहे. फोटोत ती नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे, साडीमध्येही ती परफेक्ट आणि हॉट दिसत आहे. या फोटोशूटमध्ये उर्फी वेगवेगळ्या अँगलमध्ये पोझ देताना दिसत आहे. चाहत्यांबद्दल बोलायचे झाले, तर ते हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करू आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिला सुंदर म्हटले आहे, तर काहींनी तिच्या साडीसाठी कौतुकाचे पूल बांधले आहेत.

उर्फी जावेद पॅपराजींमध्ये तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. ती कुठेही गेली, तरी तिचा ड्रेस आणि लूक चांगल्याच चर्चा रंगवतात. पॅपराजी तिचे फोटो काढण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीत, तर उर्फी देखील त्यांना निराश करत नाही.

उर्फीचे करिअर
उर्फी जावेदने सोनी टीव्हीवरील शो ‘बडे भैया की दुल्हनिया’मधून करिअरला सुरुवात केली होती. यात तिने अवनी पंतची भूमिका साकारली होती. यानंतर तिने स्टार प्लसच्या ‘चंद्र नंदनी’ या शोमध्ये छाया ही व्यक्तिरेखा साकारली. उर्फीच्या मालिकांच्या यादीत ‘सात फेरो की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’चा समावेश आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!