फॅशनमुळे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री कोण? असा जर प्रश्न विचारला, तर सर्वांच्या तोंडी फक्त एकच नाव येईल. ते म्हणजे, उर्फी जावेद होय. उर्फीने तिच्या फॅशन सेन्समुळे रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनवले. तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल कुणाला काही माहिती असो किंवा नसो, पण तिच्या लूक्सचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर उर्फीचा मोठा वावर आहे. ती दरदिवशी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तसेच, तिचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे बोल्ड अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. ती नेहमीच कोणते ना कोणते प्रयोग करताना दिसते. अशात तिला बुधवारी (दि. २० जुलै) पॅपराजींनी मुंबईमध्ये पुन्हा एकदा स्पॉट केले.
खूपच बोल्ड आहे उर्फीचा लूक
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिने तिच्या रिव्हिलिंग लूकने (Revealing Look) सर्वांचे लक्ष वेधले आहे. उर्फीने काळ्या रंगाचा ट्रान्सपरेंट कटआऊट ड्रेस (Black Transparent Cutout Dress) परिधान केला होता. यासोबतच तिने केसांचा अंबाडा बनवला होता आणि त्यावर काळ्या रंगाचे हाय हील्स परिधान केले होते. उर्फी आणि पॅपराजींचे नाते मैत्रीपूर्ण झाल्याचे दिसत आहे. ती जेव्हा कॅमेरे पाहते, तेव्हा ती दोन्हीही हात वर करते. जेव्हा पॅपराजी तिच्या लूक्सची प्रशंसा करतात, तेव्हा तीदेखील आनंद व्यक्त करते.
ड्रेसमुळे झाली ट्रोल
प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ शेअर करताच ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “प्रसिद्ध होण्यासाठी काहीही.” आणखी एका युजरने कमेंट केली की, “असं वाटतंय तिच्या कपड्यांची शिलाई स्वस्त दुकानातील शिंप्याने केलीये.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “ड्रेसची इज्जत काढली.” एका युजरने म्हटले की, “जे दिसतं, तेच विकलं जातं.” तसेच, “अजून किती बदनाम व्हायचंय”, “म्हातारपण येईल, तेव्हा हॉटनेस समजेल,” असेही काहीजण म्हणत आहेत.
View this post on Instagram
रणवीरने सांगितले होते फॅशन आयकॉन
नुकतीच उर्फी जावेद हिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण, सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याने ‘कॉफी विथ करण ७’ शोमध्ये फॅशन आयकॉन म्हटले होते. उर्फीला यावर विश्वास ठेवणेदेखील कठीण झाले होते. विशेष म्हणजे, जेव्हा रणवीरच्या वक्तव्यानंतर ती कॅमेऱ्यापुढे स्पॉट झाली, तेव्हा तिने एक टीशर्ट परिधान केला होता, ज्यावर रणवीरचा फोटो होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-