Friday, December 1, 2023

अभिनेत्री उर्फी जावेदने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘मी घरात नग्नावस्थेत वावरते कारण…’

उर्फी जावेद नेहमीच तिच्या असामान्य कपड्यांमुळे चर्चेत असते. कधी ती कंगव्याचा ड्रेस बनवते तर कधी झाडाच्या सालीपासून कपडे बनवत असते. ही अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तसेच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद. उर्फीने नुकताच आपल्या घरातील जीवनाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत उर्फीने (Urfi Javed) सांगितले की, ती घरात नेहमी नग्नावस्थेत असते. उर्फी म्हणाली, “मी घरात नग्नावस्थेत वावरते कारण मला ते आवडते. मी माझ्या घरात कोणाचीही पर्वा करत नाही. मला माझ्या शरीरावर अभिमान आहे आणि मी ते जगाला दाखवू इच्छिते.” तिचे हे वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे.

उर्फीने पुढे सांगितले की, ती नुकताच 3BHK फ्लॅट घेतला आहे आणि आता तिला घरात कपडे घालण्याची गरज नाही. ती म्हणाली, “मी आता माझ्या घरात पूर्णपणे मुक्त आहे. मी जे काही करायचं आहे ते करू शकते. उर्फी तिच्या मनाला वाटेल तस वागते. पण या करणामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

पुढे उर्फीने सांगितले की, ती टी-शर्ट आणि पायजमा दोन्ही परिधान करते, पण तिची पद्धत थोडी वेगळी आहे. ती म्हणाली, “मी पायजमा वर परिधान करते आणि टी-शर्ट खाली परिधान करते. उर्फीच्या या उत्तरावर सगळ्यांनाच हसू फुटलं. तिच्या चाहत्यांनी तिच्या या उत्तराचे कौतुक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 उर्फीच्या या खुलाशाने नेटीझन्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही लोक तिच्या या कृतीचा निषेध करत आहेत, तर काही लोक तिच्या या निर्भीडपणाचं कौतुक करत आहेत. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 4 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या पोस्ट आणि व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात. (Actress Urfi Javed told the shocking truth)

आधिक वाचा-
सलग सतव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘चंद्रमुखी 2’चाच डंका, केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई
‘मन मतलबी’ गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा; ‘शॅार्ट ॲन्ड स्वीट’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित

हे देखील वाचा