Thursday, June 13, 2024

उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; युजर म्हणाले, ‘ती राज कुंद्राच्या प्रेमात पडली…’

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा अशा गोष्टींपासून कपडे बनवते, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. तिचे नाव डोळ्यासमोर येताच ती यावेळी काय नवीन करणार असा विचार नेटकऱ्यांच्या मनात येतो. अशातच उर्फी पुन्हा एकदा तिच्या अतरंगी फॅशनसह पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. खरे तर, उर्फीचा एक नवीन व्हिडिओ समाेर आला आहे, ज्यामध्ये तिचा नवा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

उर्फी ( urfi javed ) जावेदच्या नव्या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने कोट आणि गुलाबी रंगाच्या पँटसह पांढरा क्रॉप टॉप घातला आहे. तिचा हा लूक अगदी साधा असला तरी उर्फीने ज्या पद्धतीने कॅरी केली आहे, त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. उर्फी जावेदने वरचा ब्लेझर घातला नसून, ती हॅन्गरच्या साहाय्याने स्वत:वर लटकत आहे, ज्यामध्ये तिचे तोंड स्पष्टपणे दिसत आहे.

उर्फी जावेदचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी अनेक अंदाज लावले आहेत. उर्फी जावेदचा लूक पाहून काही नेटकरी तिची तुलना थेट राज कुंद्राशी करत आहेत. फोटोग्राफरने उर्फी जावेदचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये उर्फी म्हणते, “आय लव यू राज कुंद्रा. मी सुद्धा तुझ्या सारख काहीतरी नवीन करेन.” उर्फीचा हा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीडिया यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “भाऊ, हे काय पाहावे लागत आहे.” दुसर्‍या यूजरने लिहिले की, “ती राज कुंद्राच्या प्रेमात पडली आहे, ती देखील त्याच्यासारखे काहीतरी करेल”. तिचा हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आधिक वाचा-
दिशाने इंस्टाग्रामवर शेअर केला ‘तो’ फाेटाे; नेटकरी म्हणाले, ‘ब्रा घातली असती तर..,’
शहनाज गिलच्या साध्या, सोज्वळ लूकने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, फोटो व्हायरल

हे देखील वाचा