सोशल मीडीयावर फॅशनसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फी तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी आणि तिच्या कपड्यांच्या फॅशनसाठी नेहमीच चर्चत येत असते. ती वेगवेगळ्या प्रकारची कपडे परिधान करते. त्यामुळे उर्फी अनेकदा वादाच्या फोवऱ्यात अडकते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ पाहून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करतात.
उर्फी (Urfi Javed ) तिच्या फॅशन सेन्सबाबत सतत प्रयोग करत असते, ज्यामुळे ती नेहमीच चर्चेचा येते. उर्फी तिच्या हेअरस्टाइलमुळे, तर कधी कपड्यांमुळे खूप ट्रोल होत असते. मात्र, याचा उर्फीला काहीही थोडासुद्धा फरक पडत नाही. ट्रोल्सकडे दुर्लक्ष करून उर्फी तिच्या फॅशन स्टाइलवर लक्ष केंद्रित करताना दिसते. उर्फी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येत राहते. उर्फीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे.
उर्फी आता एकता कपूरच्या आगामी ‘लव्ह, सेक्स, और धोखा 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असे बोलले जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ‘लव्ह, सेक्स और धोखा 2’ च्या निर्मात्यांनी चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी उर्फीशी संपर्क साधला आहे. कारण ती चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी पूर्णपणे फिट आहे. उर्फी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करेल अशी चिन्ह दिसू लागली आहेत. दुसरीकडे, एकता कपूरच्या चित्रपटात उर्फीची मुख्य भूमिका असल्याच्या अफवांमुळे एलएसडी 2 या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
उर्फीने अलीकडेच डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या रॅम्प वॉकसाठी चर्चेत आली होती. ‘बिग बॉस ओटीटी’, ‘स्प्लिट्सविला’मध्ये काम केल्यानंतर उर्फीच्या आउटफिट्सने केवळ लक्ष वेधले नाही, तर तिला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिच्या आउटफिटमुळे उर्फीचे इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटींसोबत वादही झाले होते. त्यावेळी उर्फीनेही सर्वांना चोख उत्तर दिले. उर्फी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. तिची ड्रेसिंग स्टाइल अनेक सेलेब्सना देखील आवडते. (Urfi Javed will make his Bollywood debut with Ekta Kapoor’s upcoming film ‘Love, Sex, Aur Dokha 2’)
अधिक वाचा-
–‘दादूस लई झ्याक दिस्तोयास…’ अभिनेता संतोष जुवेकरच्या ‘त्या’ पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव
–नात्याचा अर्थ शिकवणारा ‘जर्नी’ चित्रपट लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला, ‘हे’ बालकलाकार मिळणार पाहायला