Monday, February 10, 2025
Home बॉलीवूड मुकेश खन्ना यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उर्फी जावेद भडकली; म्हणाली, “हा माणूस…”

मुकेश खन्ना यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उर्फी जावेद भडकली; म्हणाली, “हा माणूस…”

प्रसिद्ध माॅडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फी तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्फीच्या पोस्ट पाहून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करतात. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. दरम्यान उर्फीने नुकतीच एक पोस्ट केली आहे.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि मुकेश खन्ना पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जूनला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटावर अनेकांनी टिका केली आहे. प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील या चित्रपटावर जोरदार टिका केली आहे. त्यांनी केलेल्या टिकेवरून उर्फीने एक ट्विट केलं आहे. त्यामुळे उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

उर्फी जावेदने ट्विट करताना लिहिले की, “हा माणूस पूर्णपणे वेडा आहे. चित्रपट थोडा वाईट आहे हे मला मान्य आहे, पण कुणालाही जाळू नये. मला वाटते की या माणसाला हिंसा भडकावल्याबद्दल तुरुंगात टाकले पाहिजे.” उर्फी जावेद याआधीही तिच्या ट्विट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. याशिवाय तिच्या फॅशन सेन्समुळे ती दररोज सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत असते.

यादरम्यान, “भारतातील 100 कोटी हिंदूंनो जागे व्हा आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे प्रकाशन थांबवा. या प्रकाशनाच्या निषेधात सामील व्हा. या ‘आदिपुरुष’च्या संपूर्ण टीमला जिवंत जाळलं पाहिजे.” असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर खळबळ उडली आहे. अशातचमुकेश खन्ना यांना केलेल्या वक्तव्यावर उर्फीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या विषयाने चर्चेला जोर धरला आहे. (Actor Urfi Javed made a big statement about Mukesh Khanna)
अधिक वाचा- 
बोल्ड अॅन्ड ब्युटीफूल! अभिनेत्री नोरा फतेहीचा ग्लॅमरस लूक; एकदा पाहाच
‘आदिपुरुष’च्या संपूर्ण टीमला जिवंत जाळलं पाहिजे’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक विधान; लगेच वाचा

हे देखील वाचा