Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड टी20 विश्वचषकादरम्यान पुन्हा दु:खावली उर्वशी रौतेला; म्हणाली, ‘मूव ऑन करण्याची…’

टी20 विश्वचषकादरम्यान पुन्हा दु:खावली उर्वशी रौतेला; म्हणाली, ‘मूव ऑन करण्याची…’

बाॅलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या क्रिकेटर रिषभ पंत मुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशीने पंतबद्दल वक्तव्य केलं होतं, त्यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं होतं. मात्र, त्यानंतर उर्वशीने पंतची माफीही मागितली होती. पण आता ऑस्ट्रेलियाहून परतताना उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा उर्वशी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

मेलबर्न येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात भारताने शानदार विजयाची नोंद केली. हा ऐतिहासिक विजय देशवासीयांनी जल्लोषात साजरा केला. सोशल मीडियावर सगळीकडे विराट कोहली आणि टीम इंडियाची चर्चा होती, पण एक व्यक्ती अशी होती जी क्रिकेट संघात नसतानाही प्रचंड चर्चेत होती, ती म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela). उर्वशी सामन्यादरम्यान चर्चेत आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा उर्वशी चर्चेत आली आहे.

उर्वशी रौतेला भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाहून परतली आहे. फ्लाइटवरून परत येत असताना, अभिनेत्रीने तिचे दोन सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “जाण्याचा विचार माझे हृदय तोडतो… पण मूव ऑन करण्याची वेळ आली आहे.” उर्वशी रौतेलाच्या या पोस्टवर लिहिलेल्या कॅप्शनने नेटिझन्सना पुन्हा रिषभशी उर्वशी नाव जाेडून तिला ट्राेल करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशीच्या पोस्टवर, सोशल मीडिया युजर्स कमेंट करत म्हणाले की, “रिषभ भाई मॅच खेळत नसल्याने ती भारतात परत आली.” तर एकाने कमेंट करत लिहिले की, “संपूर्ण देश तुम्हाला स्टेडियममध्ये शोधत होता आणि तुम्ही इथे आहात.” त्याचवेळी एका युजरने चक्क कमेंट करत लिहिले, “तुम्ही आता कोणाला मिस करत आहात?”

रिषभ पंत रविवारी (दि.23 ऑक्टाेबर) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही, त्यामुळे उर्वशीच्या ऑस्ट्रेलियातून परतण्यावर नेटिझन्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नयनताराने दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवली जुळ्या मुलांची पहिली झलक; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

भारत-पाकिस्तान सामन्याचा आयुष्मानने शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या एका क्लीकवर

हे देखील वाचा