Saturday, April 26, 2025
Home बॉलीवूड भारत-पाकिस्तान सामन्याचा आयुष्मानने शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या एका क्लीकवर

भारत-पाकिस्तान सामन्याचा आयुष्मानने शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या एका क्लीकवर

भारत आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपचा धमाकेदार सामना (दि.23 ऑक्टोंबर) दिवशी  पार पडला आणि भारत विजयी झाल्यामुळे त्या दिवशी देशभरामध्ये जल्लोष साजरी झाला होता. अनेकजनांनी सामन्यासंबंधी घडलेले किस्से सांगितले. त्यामध्ये कॉंग्रेसचे नेते शशी यांनीही आपला रंज किस्सा सांगितला की, त्यांनी सामना पाहण्यासाटी चक्क आपला विमान प्रवास रद्द केला. शेवटी भारताचा वर्ल्डकपचा सामना म्हणल्यावर कोणतेही काम असो कोणताही व्यक्ती सामना हापण्याची ही संधी सोडत नाही. त्याप्रमाने बॉलिवूडचा प्रसिद्ध कालाकार आयुष्मान खुराना यानेही त्याचा आणि सामन्याबद्दलचा एक रंजक किस्सा चाहत्यांना शेअर केला आहे.

अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन एक सोसल मीडिया पोस्ट शेअर करत किस्सा सांगितला आहे. त्याने देखिल विमानतळावरील पायलटने जाणून बुजून विमान 5 मिनिटे अशिरा केली असं त्याने पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्याचा मजेशीर किस्सा ऐकूण सगळेच थक्क झाले आहेत. भारत- पाक सामना ( IND vs PAK) हा सामना म्हणजे काट्याची टक्कर. त्या दिवसाची मजाच वेगळी असते आणि ती मजा लुटण्याची संधी कोणताच व्यक्ती सोडत नाही.

रविवारी आयुष्मान हा मुंबईहून चंदीगढला जाण्यासाठी विमानाने जात होता, त्याच दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा अंतिम टप्पा सुरु झाला होता आणि त्यामुळे पायलटने 5 मिनिटे विमान उशिरा उडवले हा किस्सा सांगत असताना आयुष्मानने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “ही गोष्ट माझ्या पुढच्या पिढीसाठी आहे. माझं विमान हवेत उडण्याआधी मी मुंंबई- चंदीगड फ्लाइटमध्ये दोन ओव्हर पाहिले. सर्व प्रवासी त्यांच्या फोनमध्ये सामना पाहण्यासाठी दंग होते. मला खात्री आहे की, क्रिकेटवेड्या पायलटने जाणूनबुजून विमानाचं उड्डाण पाच मिनिटे उशिराने केलं आणि कोणालाच कसलीच तक्रार नव्हती.”

भारत आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कप सामन्याच्या अखेरच्या क्षणी जणू काही सगळंच जिथल्या तिथेच थांबलं होतं. आणि सगळ्यांना विश्वास होता की, भारताचा दमदार खालाडीच विजयचा शिल्पकार ठरणार आणि ते त्याने करुन दाखवलं सामना जिंकताच विमानातील सर्व प्रवाशांनी जल्लोष केल्याचं आयुष्मानने पुढच्या पोस्टमध्ये लिहिले आणि तेव्हाच पायलटने विमान उडवण्याची प्रक्रिया सुरु केली. त्याने हा संपूर्ण किस्सा फोनच्या कॅमेऱ्याणदध्ये कैद करता आले नाही याची खंत देखिल व्यक्त केली. त्याचप्रमाने अभूतपूर्व क्षण अनुभवायला मिळाला याचा आनंदही आयुष्मानने व्यक्त केला. त्यासोबतच दिवाळीचा आनंद आणि एक दिवस अगोदर जल्लोष देशातील नागरिकांना देण्यासाठी आयुष्मानने विराटचे आभारही मानले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रभासच्या चाहत्यांनी केला कहर; चक्क चित्रपट गृहातच वाजवले फटाके अन् …
दिवाळी पार्टीत न्यासा देवगणचा लूक पाहून व्हाल थक्क; नेटकरी म्हणाले,’ चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केलीस…’

हे देखील वाचा