मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू अशी ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या डायलॉगने घराघरातील सूनेचा थरकाप उडतो, संपूर्ण इंडस्ट्री ज्यांना आऊ या नावाने ओळखते, त्या म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni)होय. उषा यांनी अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. एवढंच काय तर आपल्या अभिनयाचा डंका त्यांनी हिंदी टेलिव्हिजनपर्यंत गाजवला आहे. उषा यांनी बहुतांश वेळा नकारात्मक भूमिका निभावली आहे. तरीही प्रेक्षकांमध्ये त्यांचा दबदबा आहे. (13 सप्टेंबर) आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊ त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास.
उषा नाडकर्णी यांचा जन्म 13 सप्टेंबर 1946 रोजी, मुंबई येथे एका सर्व सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी बी.ए. करून पदवी संपादन केली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. त्यांनी कॉलेजमध्ये असताना देखील नाटकात काम केले होते. तिथूनच अभिनयाची आवड त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी अभिनयात करिअर करण्याचे ठरवले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाल्यामुळे आपल्या मुलीने जेमतेम शिकून एखादी छोटीशी नोकरी करावी आणि नंतर लग्न करावे, हाच त्यांच्या घरातील लोकांचा समज होता. किंबहुना त्यांच्याकडून तशी अपेक्षा होती. पण त्या काळात हे वेगळे क्षेत्र निवडल्याने त्यांच्या आईला अजिबात आवडले नव्हते. त्यांनी उषा यांना अभिनय क्षेत्रात जाण्यास बंदी घातली होती. पण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी सगळी बंधने नाकारून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
(Actress usha nadkarni celebrate her birthday, let’s know about her)
उषा नाडकर्णी या ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामध्ये स्पर्धक होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली या बद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, “माझ्या आईला मी अभिनय क्षेत्रात जावे अशी अजिबात इच्छा नव्हती. तिने मला याबाबत सक्त ताकीद दिली होती. पण माझे स्वप्न मी विसरू शकत नव्हते. त्यामुळे मी एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आणि अभिनेत्री बनायला घरातून पळून गेले. हो! पण त्यावेळी मी हे निश्चित केली होते की, मी फक्त अभिनयावर लक्षकेंद्रित करणार. इतर कोणत्या गोष्टीकडे पाहणार देखील नाही. मी फक्त दोन जोडी कपड्यांवर घराबाहेर पडले होते. तिथून पुढे मी अनेक नाटकात काम केले. हळूहळू मला मालिका, चित्रपटात काम मिळाले. तेव्हा कुठे जाऊन माझ्या आईला समाधान वाटले. मी ठरवले होते की, जेव्हा मी यशस्वी होईल तेव्हाच घरी जाईल आणि मी तसेच केले.”
उषा नाडकर्णी यांनी अनेक मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला त्यांच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. त्यांनी 1979साली ‘सिंहासन’ या मराठी चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘प्रतिघात’, ‘सडक छाप’, ‘धुमाकूळ’, ‘माहेरची साडी’, ‘निष्पाप’, ‘यशवंत’, ‘वास्तव’, ‘यह तेरा घर यह मेरा घर’, ‘हत्यार’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘पक पक पकाक’, ‘आई मला माफ कर’, ‘सखी’, ‘अगडबम’, ‘देऊळ’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
यासोबत त्यांनी ‘थोडी सी जमीन थोडासा आसमा’, ‘रिश्ते’, ‘विरुद्ध’, ‘पवित्र रिश्ता’, ‘मधुबाला एक इश्क एक जूनून’, ‘खुलता कळी खुळेना’, ‘खतरा खतरा खतरा’, ‘घाडगे ऍंड सून’, ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत काम केले आहे. त्यांचे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील पात्र सगळ्यांना खूप आवडले होते. यासोबत त्यांनी मराठी बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. यानंतर त्या खूप नावारूपाला आल्या होत्या.
हेही नक्की वाचा-
–ज्या वेगाने आली, त्याच वेगाने झाली या क्षेत्रातून गायब; जाणून घ्या महिमा चौधरीबद्दल
–Accident | चेहऱ्यात घुसल्या होत्या तब्बल 67 काचा, महिमा चौधरीने केला ‘त्या’ भयावह रात्रीचा खुलासा