Saturday, June 29, 2024

‘ही बार्बी नाही, म्हैस आहे….’ बॉडी शेम करणाऱ्यांवर वाहबिज दोराबजींने दिलं सडेतोड उत्तर

टेलिव्हिजन अभिनेत्री वाहबिज दोराबजी आपल्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. आता वेगळ्या कारणामुळे ती पुन्हा चर्चेत आहे. वाहबिज दोराबजीला ‘प्यार की ये एक कहानी’, ‘बहु हमारी रजनीकांत’ यांसारख्या टीव्ही शोमधून खूप लोकप्रियता मिळाली. वाहबिजला फॅशनदिवा यासाठी देखील ओळखले जाते. पण कधीकधी ती बॉडीशेमीगमुळे ती ट्रोलच्या निशाण्यावरही येते. अलीकडेच, अभिनेत्रीने नुकताच बार्बी ट्रेंडवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तर वाहबिजने आता ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

झालं असं की, जेव्हापासून बार्बी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून सर्वसामान्य पासून ते सेलिब्रिटी बार्बी लुक करून व्हिडिओ शेअर करत आहे. अभिनेत्री वाहबिज दोराबजीने (Vahbbiz Dorabjee) देखील तिच्या इंस्टाग्रामवर तिचा एक रील व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या बार्बी लूकला तिच्या पद्धतीने फ्लॉंट केले आहे.

अभिनेत्रीने फ्लोरल आउटफिट घातला होता पण काही नेटिझन्सना तिची स्टाइल आवडली नाही आणि त्यानंतर वाहबिज ट्रोल होऊ लागली. इतकंच नाही तर काहींनीतर बॉडीशेमीग केले. मात्र, वाहबिजने ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत ट्रोलला चोख प्रत्युत्तर दिले.

ट्रोलर्सवर ताशेरे ओढत अभिनेत्रीने लिहिले की, “माझ्या बार्बी व्हिडिओवर असभ्य कमेंट्स पाहून मला वाईट वाटले. काही लोक बार्बी नाही तर.. मी म्हैस आहे, असे म्हटले आहे. अशी बार्बी प्रथमच पाहिली आणि बरेच काही लिहिले आहे. आजही मुली समाजाच्या विचारसरणीच्या मागे लागल्या आहेत हे अत्यंत लाजिरवाणे आहे. पण आता काळ बदलत आहे आणि मी स्टिरियोटाइप फॉलो करण्यास नकार देते”.

तसेच तिने पुढे लिहिले की, “मी त्या सर्व मुलींसाठी भूमिका घेत आहे ज्या स्वत:साठी उभ्या राहत नाहीत. बदलत्या काळानुसार बदलायला हवे. आम्हाला बोलण्या ऐवजी तुमच्या चारित्र्याचा विचार करा आणि एक चांगली व्यक्ती बनण्यावर तुमचे लक्ष केंद्रित करा. आता समाजाने आपली मानसिकता बदलली वेळ आली आहे.” तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे. (Actress Vahbbiz Dorabjee gave a bitter reply to those who shamed the body)

हेही वाचा-
वयाने 39 वर्षे मोठ्या रजनीकांत यांची हिरोईन बनण्यावर तमन्नाचे विधान; म्हणाली, ‘मी तर 60व्या वयातही…’
‘शेतीच्या कामाला बैल, कष्टाच्या कामाला गाढव आणि विकासाच्या कामाला *** लागतो’, सयाजी शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा