बॉलिवूडमधील खिलाडी म्हणून ओखला जाणारा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार सतत आपल्या नवीन चित्रपटांमुळे चर्चेत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांंध्ये अभिनेत्याचे एका पाठोपाठो चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. मात्र, यावेळेस अभिनेता आपल्या चित्रपटामुळे नाही तर हॉलिवूड चित्रपट ‘अवतार: द वे ऑफ वॉटर‘ मुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने जेम्स कॅमरून याचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) हा चित्रपट त्याने पाहिल्यानंतर तिने मंगळवार (दि, 13 डिसेंबर) रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याने मंगळवारी हॉलिवूड चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाला होता. त्याशिवाय त्याने चित्रपटाचा रिव्ह्युव देखिल दिला आहे.
अक्षय कुमारने ट्वीटरवर ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करत असताना लिहिले की, “काल रात्री ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ ‘ पाहिला आणि अरे मुलगा!! अप्रतिम शब्द. मी अजूनही मंत्रमुग्ध आहे.” आपल्या ट्वीटमध्ये जेम्स कॅमेरॉनला टॅग करत त्यांने लिहिले की, “मला तुमच्या अलौकिक कलाकृती @JimCameron यांना नमन करायचे आहे.लाइव ऑन.”
Watched #AvatarTheWayOfWater last night and Oh boy!!MAGNIFICENT is the word. Am still spellbound. Want to bow down before your genius craft, @JimCameron. Live on!
— Akshay Kumar (@akshaykumar) December 14, 2022
सांगायचे झाले तर, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ 2009 सालचा ब्लॉकबस्टर ‘अवतार’ चित्रपटाचा सिक्वल आहे. डेडलाइनच्या मते या चित्रपटातून $525 मिलियनचे ग्लोबल बॉक्सऑफिसच्या कलेक्शनची आशा आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ डिझनी चॅनेलला आतापर्यतचे सगळ्यात मोठे ग्लोबल प्रदेर्शन बोलले जात आहे. कारण हा चित्रपट मार्वलचा ‘एवेंजर्स: एंडगेम’ला मागो टाकत असून तब्बल 52,000 स्किनवर प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘आरआरआर चित्रपटावेळी राजामौली यांना अस्थमाचा अटॅक आला, तरीही…’, श्रिया सरनने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
‘कंगन’ खेळण्याच्या कार्यक्रमामध्ये जिंकली देवोलिना, तर लाजून पती शाहनवाजने लपवले तोंड