Sunday, June 4, 2023

‘पठाण’साठी दीपिकाने 15, तर जॉनने घेतले 20 कोटी, शाहरुखच्या मानधनाचा आकडा सरकवेल पायाखालची जमीन

तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चाहते सुपरस्टार शाहरुख खान याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शाहरुख नवीन वर्षात ‘पठाण‘ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, इतक्या वर्षांनंतर पुनरागमन करत असल्यामुळे शाहरुख खान मानधन किती घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात ‘पठाण’ या सिनेमाच्या स्टार कास्टच्या मानधनाबदद्ल जाणून घेऊया.

कुणी किती रुपये मानधन घेतले?
शाहरुख खान
‘पठाण’ (Pathan) या सिनेमासाठी शाहरुख खान (Shahrukh Khan) याने त्याच्या फिटनेसवर जबरदस्त काम केले आहे. त्याने खास डायट घेतले आहे आणि त्याने जबरदस्त वर्कआऊटही केला आहे. या सिनेमाबद्दल शाहरुख स्वत:ही खूपच उत्सुक आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शाहरुखने पठाणसाठी सर्व कलाकारांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन घेतले आहे. त्याने या सिनेमासाठी 100 कोटी रुपये घेतल्याचे वृत्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

दीपिका पदुकोण
अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या सिनेमातून पुन्हा एकदा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमातील ‘बेशर्म रंग’ या लेटेस्ट गाण्यामध्ये दीपिका आणि शाहरुखची सिझलिंग केमिस्ट्री सर्वांचे लक्ष वेधत आहे. दीपिका या सिनेमात खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘पठाण’साठी दीपिकाने 15 कोटी रुपये मानधन घेतले आहेत.

जॉन अब्राहम
‘पठाण’ सिनेमात दीपिका आणि शाहरुखव्यतिरिक्त जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात जॉन व्हिलन बनणार आहे. तसेच, तो जबरदस्त ऍक्शन करतानाही दिसणार आहे. ‘पठाण’साठी जॉनने तगडे मानधन घेतले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, जॉनने या सिनेमासाठी जवळपास 20 कोटी रुपये घेतले आहेत.

डिंपल कपाडिया
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) याही ‘पठाण’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. असे वृत्त आहे की, ‘पठाण’ सिनेमात त्या एका रॉ (RAW) अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, त्यांच्या मानधनाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये.

शाहरुख आणि दीपिकाचा हा सिनेमा 25 जानेवारी, 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होईल. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘पठाण’ सिनेमाची शूटिंग तब्ब्ल 8 देशांमध्ये झाली आहे. तसेच, हा सिनेमा बनवण्यासाठी तब्बल 250 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींनी दाखवले त्यांचे मास्टर बेडरूम; म्हणाल्या, ‘आम्ही सर्वजण आता एकत्र…’
‘खोटं का बोलतोय राम?’, अभिनेत्याने स्वत:ला म्हटले नेहा कक्करचा फॅन, युजर्सनी पाडला कमेंट्सचा पाऊस

हे देखील वाचा