Saturday, June 15, 2024

लिपस्टिक हवेत उडवून साधी विद्या झाली ग्लॅमरस, अभिनेत्रीचा नवीन व्हिडिओ व्हायरल

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिभासंपन्न अभिनेत्री जर कोणी विचारले, तर डोक्यात सर्वात पहिले नाव येते ते विद्या बालनचे. विद्याने तिच्या दमदार अभिनयाने चित्रपटांच्या दुनियेत स्वतःची वेगळी आणि अढळ जागा तयार केली आहे. विद्याने भराभर सिनेमे न करता मोजक्याच पण आशयसंपन्न चित्रपटांना प्राधान्य दिले. विद्याचा लवकरच ‘शेरनी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद बघता हा सिनेमा देखील सुपरहिट होणार हे नक्की.

सध्या विद्या ‘शेरनी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान विद्याचा एक मस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विद्याचे दोन वेगवेगळे लूक्स दिसत आहेत. नेहमी साध्या आणि भारतीय पोशाखात वावरणाऱ्या विद्याचा या व्हिडिओमध्ये ग्लॅमरस लूक फॅन्सला पाहायला मिळत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला अतिशय सध्या ड्रेसमध्ये दिसत असलेली विद्या लिपस्टिक हवेत उडवते आणि लगेच ब्लॅक रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये बदलली जाते. या बदलेल्या लूकमध्ये विद्याचा बोल्ड एँड ब्युटीफुल अवतार दिसत आहे. विद्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले, “घरी बसून नवीन मेकअप ट्रिक्स शिकताना.’ तिच्या या व्हिडिओला फॅन्सकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला अडीच लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून सोबतच असंख्य कमेंट्स देखील मिळत आहेत.

विद्याने टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘हम पांच’मधून अभिनयात पदार्पण केले. २००५ साली विद्याने सुजित सरकारच्या ‘परिणिता’ सिनेमातून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने एका पेक्षा एक असे अनेक सरस सिनेमे केले. यात ‘पा’, ‘कहाणी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘तुम्हारी सुलु’, ‘शकुंतला देवी’ आदी अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. विद्याला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘शेरनी’ या सिनेमात विद्या एका फॉरेस्ट अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा