Thursday, July 18, 2024

कॅटरिनाने पतीच्या स्टाईलमध्ये केले प्रमोशन, स्टेजवर विकीचे डायलॉग ओरडताना दिसली अभिनेत्री

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या तिच्या आगामी ‘फोन भूत‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चित्रपटाची संपूर्ण टीम त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपुर्वी कॅटरिना कैफ हातात बॅट घेऊन क्रिकेटच्या खेळपट्टीवर षटकार आणि चौकार मारताना दिसली होती, तर आज तिचा एक नवीन व्हिडिओ साेशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये ती पती विकी कौशलची कॉपी करताना दिसत आहे, हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या कॅटरिना कैफ (katrina kai) तिच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट फोन भूतचे प्रमोशन करत आहे. अशात त्यांचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये कॅटरिना तिचा नवरा अभिनेता विकी कौशलच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील एक लोकप्रिय संवाद बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कॅटरिना स्टेजवर उभी राहून विक्कीप्रमाणे ‘हाऊ इज द जोश’ ओरडताना दिसत आहे. कॅटरिनाच्या या प्रश्नाला चाहत्यांनीही उत्साहाने उत्तर दिले आणि ‘हाय’ असे म्हटले. विकी कौशलच्या स्टाईलमध्ये तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करणे लोकांना खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या प्रमोशन इव्हेंटमध्ये इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील उपस्थित होते, परंतु कॅटरिनाने आपल्या स्टाईलने सर्वांचीच लाइमलाइट मिळवली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अभिनेत्रीचे चाहते सतत कमेंट करत आहेत आणि तिच्या प्रश्नाचे उत्तरही देत ​​आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “मॅडम, जोश माउंट एव्हरेस्टइतका मोठा आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “हाय मॅडम.” त्याचवेळी, अनेक चाहते व्हिडिओमधील कॅटरिनाच्या हावभावाचे वर्णन करत तिला क्यूट म्हंटले आहे.

‘फोन भूत’ चे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून रविशंकरन आणि जसविंदर सिंग यांनी लिहिले आहे. या चित्रपटात कॅटरिन कैफ व्यतिरिक्त ईशान, सिद्धांत आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा हॉरर कॉमेडी चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ पाहून भडकली अनुष्का शर्मा; म्हणाली, ‘सर्वात वाईट’
‘कांतारा’चा बॉलिवूड रिमेक बनणार नाही! रिषभ शेट्टीने सांगितलं ‘हे’ मोठं कारण

हे देखील वाचा