Tuesday, May 28, 2024

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटचे विद्या बालनने केले समर्थन, म्हणतेय ‘आम्हाला पण बघू द्या की त्याचं’

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranvee Singh) न्यूड फोटोशूटचीच सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. हे फोटो त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुनही शेअर केले होते. रणवीरचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर अश्लिलता पसरवत असल्याचा आरोप केला होता. तर काही जणांनी त्याच्या या फोटोशूटला समर्थनही दिले होते. आता नुकतीच अभिनेत्री विद्या बालननेही रणवीरच्या या फोटोशूटला समर्थन देणारी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली ती नेमक, चला जाणून घेऊ. 

विद्या बालन (Vidya Balan) ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने बोल्डलूकने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्या बालन जितकी तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या बोल्ड आणि बिंधास्त वक्तव्यासाठीही ओळखली जाते. अनेक विषयांवर ती आपले मत जाहीरपणे व्यक्त करत असते. सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या रणवीर सिंगच्या न्यूड  फोटोशूटबद्दलही विद्या बालनने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

विद्या बालनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिला कॅमेरावाल्यांनी घेरल्याचे दिसत आहे यावेळी पापाराझींनी विद्या बालनला रणवीरच्या फोटोशूटबद्दल विचारल्यानंतर तिने “काय अडचण आहे, आमच्याही डोळ्यांना बघू दे ना जरा,” अशी गतमीशीर प्रतिक्रिया दिली. यानंतर ती जोरजोरात हसायला लागली. त्याचबरोबर विद्या बालनने रणवीर सिंगच्या या फोटोशूटविरोधात तक्रार करणाऱ्यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. “तक्रार करणाऱ्यांना काही काम नाही, म्हणून ते असे उद्योग करतात म्हणत तुम्हाला आवडत नसतील तर कशाला पाहता फोटो?” असा सवालही तिने विचारला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ent zee (@ent.zee123)

 

सध्या विद्या बालनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून तिच्या या वक्तव्याचीही जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विद्या बालनच्या अभिनय कारकिर्दिबद्दल बोलायचे झाले तर, ‘द तिने डर्टी पिक्चर’, ‘भुलभूलैय्या’, ‘कहाणी’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्याच्या आईचे दुखःद निधन, शेअर केली ह्रदयस्पर्शी पोस्टअबब! ‘खतरों के खिलाडी’मधील प्रतीक सहजपालचा अपघात, आकाशातून प्लेन घरंगळत डायरेक्ट जमिनीव‘लायगर’ सारखा चित्रपट करूनही अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा का फिरतायत लोकलने?

हे देखील वाचा