Tuesday, May 28, 2024

न्यूड फोटोशूट करताना काय होती रणवीर सिंगची अवस्था?, फोटोग्राफरने सांगितल्या कॅमेरामागील गोष्टी

अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. या फोटोंसाठी काही लोक रणवीर सिंगची स्तुती करत आहेत तर काही लोक त्याला कडाडून विरोध करत आहेत. रणवीरवर मुंबईतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंगने हे फोटोशूट ‘पेपर मॅगझिन’साठी केले आहे. ज्यावर संपूर्ण जगाने आपले मत दिले, पण आता त्या व्यक्तीचे मतही समोर आले आहे ज्याने कॅमेऱ्याच्या मागे उभे असताना रणवीरचे हे फोटो कॅमेऱ्यात कैद केले.

रणवीर सिंगचा फोटो घेणारे फोटोग्राफर आशिष शाह (ashish shah) यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, न्यूड फोटोशूटची कल्पना स्वतःची आणि रणवीरची होती. दोघांनी मिळून न्यूड फोटो काढायचे ठरवले होते. आशिषने सांगितले की, “जेव्हा आम्ही दोघे एकमेकांना भेटलो तेव्हापासून आम्ही खूप आरामात होतो. फोटोशूटदरम्यान रणवीर सिंग लाजत नव्हता किंवा भानही नव्हता. त्याने खूप चांगली कामगिरी केली. आमच्यात एकमेकांबद्दल अतिशय निरोगी परस्पर आदर होता. मला असे वाटते की, त्याला माझ्या शरीराच्या कामाबद्दल देखील माहिती होती.”

आशिषने सांगितले की, “हे खूप डिमांडिंग शूट होते, कारण रणवीरला विशिष्ट बॉडी शेपमध्ये असायला हवे होते आणि मला त्याला वेगळ्या पोश्चरमध्ये दाखवायचे होते.” फोटोग्राफर आशिष शाह यांनी सांगितले की, “हे फोटोशूट करण्यासाठी त्यांना सुमारे ३ तास लागले. रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे.ठ

पेपर मॅगझिनसाठी शूट केलेली हे फोटो २१ जुलै रोजी पोस्ट करण्यात आले होते. या फोटोंबाबत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील बहुतांश कलाकारांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. इंदूरमधील एका एनजीओने याला विरोध केला आहे. मुंबई पोलिसांत आयपीसीच्या विविध कलमान्वये आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मी टाईमपास करत लिहत नसतो हे तू लक्षात घे’, प्रियदर्शन जाधवने दगडूला दिला इशारा

अश्लीलता पसरवल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी पोहोचली कोर्टात, ‘या’ व्यक्तीने केले होते सार्वजनिक ठिकाणी किस

‘प्रिय शमशेरा…’, चित्रपट फ्लॉप होताच करण मल्होत्राची ‘ती’ भावूक पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा