बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला आपण अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मोठ्या पडद्यावर काम करून तिने चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळीच छाप पाडली आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम दिले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटातील तिचं पात्र लोकप्रिय झालं आहे. तिच्या अभिनयासोबत ती तिच्या लूककडेही लक्ष देत असते. पण मागील काही दिवसांमध्ये विद्याला तिच्या वाढत्या वजनामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. तिच्यावर कमेंट करणाऱ्या अनेकांना तिने शांतपणे पण आणि अगदी परखडपणे उत्तर देखील आहे. नुकतेच विद्याने तिच्या वाढत्या वजनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विद्या बालनने ‘टाईम्स ऑफ इंडिया’सोबत बोलताना वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना सांगितल्या आहेत. विद्याने 2011 साली आलेल्या ‘द डर्टी’ या चित्रपटात साऊथची अभिनेत्री ‘सिल्क स्मिथ’ हिचे पात्र निभावले होते. या पात्राला प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी तिला तिचे वजन वाढवावे लागले होते. या चित्रपटातील तिच्या वजनाची चर्चा सर्वत्र पसरली होती. या गोष्टीवरून तिला अनेकदा ट्रोलिंगचा ही सामना करावा लागला होता.
विद्या बालनने असे सांगितले होते की, “माझ्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की, मी कोणत्या परिस्थितीतून गेले आणि तेव्हा मी नक्की काय केले. परंतु माझे वजन हा मुद्दा सार्वजनिक बनला होता आणि ते माझ्यासाठी खूपच अपमानकारक होतं. माझे वाढते वजन राष्ट्रीय मुद्दा बनले होते. मी आधीपासूनच अशी आहे. मी असं नाही म्हणत की, माझ्या वाढत्या वजनाने मला काही त्रास नाही होत, पण मला अनेक प्रसंगांतून जावे लागले आहे.”
विद्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालं. तिने तिच्या करिअरबद्दल देखील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने सांगितले की, ‘द डर्टी’ या चित्रपटानंतर ती खूपच चिंतेत होती की, तिच्या घरचे यावर काय प्रतिक्रिया देतील. परंतु तिच्या घरच्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ
-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार