मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) होय. निया सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावरून आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नियाचे चाहते देखील तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. अशातच आता नियाने तिच्या पुणे दौऱ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो वाऱ्यासारखा तुफान व्हायरल होत आहे.
नियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती नुकतीच पुण्यात आली होती. नियाने शेअर केलेला हा व्हिडिओ पुण्यातीलच एका क्लबमधील आहे. या क्लबमध्ये ती आपल्या पुणेकर चाहत्यांसोबत कल्ला करताना दिसत आहे. आपल्या बिनधास्त स्वभावामुळे आणि हॉट लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या नियाचा हा अंदाज देखील पुणेकरांच्या चांगलाच पसंतीस पडलेला दिसत आहे.
नियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तिने पांढऱ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहे. पांढऱ्या रंगाच्या या आऊटफिटमुळे तिचे रूप आणखी खुलून दिसत आहे. क्लबमधील एका टेबलवर उभी राहून निया डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. क्लबमधील इतर लोक देखील नियाबरोबर बिनधास्त डान्स करताना दिसत आहेत. नियाने शेअर केलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते प्रचंड प्रेम व प्रतिसाद देत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
दरम्यान, टेलिव्हिजनवरील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये नियाचे नाव घेतले जाते. तिने आजवर अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘इश्क में मरजावां’ अशा अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत निया घराघरात पोहोचली आहे. तसेच नुकतीच ती एका म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझे अक्सा बीच घूमा दूं’ गाण्यावर अनुपमा आणि अनुजने रस्त्यावर केला धमाकेदार डान्स
-‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’
-अरे संसार संसार! मानसी नाईक सासरी करतीये चुलीवर चपात्या, व्हिडिओ झाला व्हायरल