‘कोण म्हणतं अदा शर्मा फ्रेंडली नाहीये?’ अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडिओला चाहत्यांची पसंती


साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटात काम केलेली अभिनेत्री अदा शर्माची गणना सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिचे योगा आणि वर्क आऊट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. ती जेव्हाही वर्क आऊट करताना व्हिडिओ शेअर करत असते, तेव्हा ते हा हा म्हणता व्हायरल होत असतात. या सोबतच ती तिच्या एका वेगळ्याच स्टाईलमुळे चर्चेत असते. आता देखील अदाचा एका मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती काठी घेऊन मार्शल आर्ट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे या व्हिडिओचे कॅप्शन.

हा व्हिडिओ शेअर करून अदाने लिहिले आहे की, “कोण म्हणतं की, अदा शर्मा फ्रेंडली नाहीये. मैत्री करा आणि ती आल्यावर काम सोडून पळून जा.” अदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ८५ हजारपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

अदा शर्माचे सोशल मीडियावर कमालीचे फॅन फॉलोविंग आहे. ती इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे ५.३ मिलियनपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. तिचे व्हिडिओ बघून सगळेच दीवाने होतात. तिच्या फॅशन सेन्समुळे देखील ती खूप चर्चेत असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. (Adah Sharma’s latest video viral on social media)

अदा शर्माच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, तिने २००८ साली तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी ती केवळ १६ वर्षाची होती. तिने विक्रम भट्ट यांच्या ‘१९२०’ मध्ये काम केले होते. हिंदी चित्रपटात जास्त यश न मिळाल्याने ती साऊथ इंडस्ट्रीमध्ये गेली. तिने २०१४ साली ‘हार्ट अटॅक’ या चित्रपटात तेलुगू चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती अल्लू अर्जुनसोबत ‘सन ऑफ सत्यमुर्ती’ या चित्रपटात दिसली होती. या आधी ती शेवटाची ‘कमांडो ३’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.