Thursday, June 13, 2024

…अन् दुधीचा रस आदेश बांदेकरांच्या जीवावर बेतला; म्हणाले, ‘उद्धव साहेबांच्या फोनमुळे…’

आदेश बांदेकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रियता मिळवली आहे. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत सात वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत घडलेल्या जीवघेण्या घटनेबद्दल सांगितले. आदेश बांदेकर हे आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमीच पालेभाज्या किंवा विविध भाज्यांच्या रसांचं सेवन करतात. परंतु, एके दिवशी आरोग्यदायी मानला जाणारा दुधीचा रस त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.

18 डिसेंबर 2015रोजी आदेश बांदेकर (Adesh Bandekar ) सकाळी उठले आणि त्यांना कर्जतला शूटिंगसाठी जायचं होतं. सुचित्रा तिच्या कामानिमित्त आधीच बाहेर गेली होती. तेव्हाच मला उद्धव साहेबांचा फोन आला होता. त्यावेळी त्यांनी घरी दुधीचा रस बनवला आणि तो पिण्यास सुरुवात केली. मात्र, दुधी कडू असल्याने त्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. पुढच्या दीड ते दोन तासांमध्ये त्यांना तीन ते साडेतीन लिटर रक्ताची उलटी झाली. रक्ताच्या उलट्यांमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात पोहोचल्यावर आदेश बांदेकर यांना तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक होती. डॉक्टरांनी आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की, “आता आमच्या हातात काही नाही.” सुचित्रा बांदेकर रुग्णालयात आल्या आणि त्यांनी आदेश बांदेकर यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यास डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर आदेश बांदेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

आदेश बांदेकर यांनी या अनुभवातून एक महत्त्वाची गोष्ट शिकली. त्यांनी सांगितले की, “आपल्या आजी कोणतीही भाजी कापली की, आधी ती चावून बघायची. हे करणं फार गरजेचं आहे. असे प्रसंग आयुष्यात बऱ्याचवेळा येतात आणि आपल्याला खूप काही शिकवून जातात.” या घटनेनंतर आदेश बांदेकर यांनी आरोग्याची अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. ते आता कोणत्याही भाजीचा रस पिण्यापूर्वी त्याची चव चाखतात. (Adesh Bandekar said that was a fatal incident)

आधिक वाचा-
‘या’ कारणास्तव ललित प्रभाकरने दिली ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटला भेट; म्हणाला, ‘एक व्यक्ती म्हणून ..’
‘जिंकणं पाहिलं नाही; हरणं मात्र…’सुबोध भावेची पोस्ट व्हायरल; नेटकरी म्हणाले, ‘या जगात फक्त…’

हे देखील वाचा