Monday, December 9, 2024
Home मराठी ‘ती १८ वर्षाची झाली आणि आम्ही पळून गेलो…’ खूपच फिल्मी आहे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची लव्हस्टोरी

‘ती १८ वर्षाची झाली आणि आम्ही पळून गेलो…’ खूपच फिल्मी आहे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची लव्हस्टोरी

मराठी सिनेसृष्टीमध्ये असे अनेक कपल आहेत, जे खूप लोकप्रिय आहे. परंतु आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही जोडी एका आदर्श कपल सारखी मानले जाते. आदेश बांदेकर (Adesh bandekar) हे गेले अनेक वर्ष होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे होस्टिंग करत आहेत. त्याचप्रमाणे सुचित्रा बांदेकर (suchitra bandekar) यांना आपण अनेक चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये पाहिले आहे. नुकताच त्यांचा आलेला ‘बाई पण भारी देवा’ हा चित्रपट देखील खूप गाजला.

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. याबद्दल आदेश बांदेकर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीचा देखील उल्लेख केला आणि त्यांची लव स्टोरी नक्की कशी झाली हे सांगितले.

त्यावेळी त्यांनी सांगितले की, “मी मालिकेच्या सेटवर गेलो आणि त्यात मला अभिनय करायचे आहे असे सांगण्यात आले. माझा फार काही मोठा रोल नव्हता तिथेच बाजूला पायऱ्यांवर सुचित्रा बसली होती आणि त्या सिनदरम्यान चार-पाच स्टेक झाले. आणि सुचित्रा आणि माझी नजर झाली आणि तिथूनच आमची सुरुवात झाली.”

त्यानंतर त्यांनी सांगितले की, “ती हम पाच ही मालिका करत होती. तेव्हा ती शाळेत होती तिची शाळा सुटायच्या वेळेस मी बरोबर दादरला असायचो. आणि सुरुवातीचे काही दिवस काहीतरी कारण सांगून मी तिला भेटायचो. त्यानंतर तिला जसे समजले तेव्हा ती मला पाहून रस्ता बदलायला लागली. पण नंतर तिने माझ्यावर विश्वास ठेवून मला होकार दिला.”

त्यानंतर काही दिवसांनी ते दोघेही एका हॉटेलमध्ये बसलेले असताना तिथे सुचित्राचे वडील आले. त्यावेळी आदेश बांदेकरांनी बेटरचा शर्ट घालून तेथून पळून गेले. या प्रसंगानंतर सच चित्राचे वडील खूप चिडले होते. आदेश बांदेकर यांच्यासोबत लग्न करायला सुचित्रा बांदेकर यांच्या वडिलांचा नकार होता. त्यामुळे त्या दोघांना पळून जाऊन लग्न करावे लागलं.

याबद्दल आदेश बांदेकर म्हणाले की, “हॉटेलमध्ये झालेल्या प्रसंगा नंतर तिचे वडील खूप चिडले होते. परंतु सुचित्राचे प्रेम होते आणि विश्वास देखील होता त्यानंतर पंधरा दिवसांनी सुचित्राला अठरा वर्षे पूर्ण झाली. आणि त्यानंतर एका महिन्याच्या नोटिसेनंतर आम्ही पळून जाऊन लग्न केले.”

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी 14 नोव्हेंबर 1990 मध्ये लग्न केले आणि त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आता त्यांना सोहम नावाचा एक मुलगा देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी होते फक्त ३० रुपये, फराह खानने सांगितली तिची स्ट्रगल स्टोरी
‘केबीसी’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सांगितला वहिदा रहमान यांच्या मेकअपचा किस्सा, ऐकून सगळेच झाले हैराण

 

हे देखील वाचा