Monday, April 15, 2024

बाॅलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत योगो करण्यात एक्यपर्ट; तुम्हीही या टिप्स फॉलो करा

बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. अनेकजण योगा करतात. 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत आहेत. बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्रीनी योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, दिशा पटनी यासारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगत असतात. बॉलीवूड अभिनेत्री फिट राहण्यासाठी कोणत्या प्रकारचे वर्कआउट करतात ते जाणून घेऊया.

योगा
भारतामध्ये अनेक वर्षांपासून योगा (Yoga Day) केला जात आहे, परंतु गेल्या काही वर्षांत त्याला जास्त लोकप्रियता मिळाली आहे. आपल्या बॉलीवूड अभिनेत्रींना देखील योगाचे वेड आहे. त्या अनेकदा सोशल मीडियावर योगा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि मलायका अरोरा यांना योगा करणयास खूप आवडतो. योगासने केल्याने तणाव कमी होतो, झोप चांगली लागते आणि शरीर लवचिक होते.

पिलाटे
अभिनेत्री आलिया भट्ट, करीना कपूर, जान्हवी कपूर, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यामुळे पिलाटे खूप लोकप्रिय झाले आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही पिलाटे करायला आवडते. हा योगा केल्यामुळे शरीराचा समतोल राखला जातो. तसेच कॅलरीज बर्न करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

बॉक्सिंग
बॉक्सिंगमुळे खांद्यातील ताणाची समस्या कमी होते. पाठीचा कणा लवचिक आणि खूप मजबूत होतात. तसेच स्नायू मजबूत होतात आणि पचनशक्ती वाढते. अभिनेत्री दिशा पटनी, रकुल प्रीत सिंग, कियारा अडवाणी यांना बॉक्सिंग करायला खूप आवडते. हे केल्यामुळे स्टॅमिना वाढतो आणि शरीर मजबूत होते. हा एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे.

वेट ट्रेनिंग
बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फिटनेस रूटीनमध्ये वेट लिफ्टिंगचा खूप प्रमाणात समावेश करतात. अभिनेत्री दिशा पटनी हा योगा करताना दिसते. ती तिचे शरीर फिट ठेवण्यासाठी योगा करते. कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मासारखे स्टार्सही वेट ट्रेनिंग करताना दिसतात.

स्विमिंग
फिटनेससाठी स्विमिंग हा एक चांगला पर्याय आहे. लोक स्विमिंगचा आनंद घेतात आणि त्यामुळे त्यांचा फिटनेसही कायम राहतो. हे संपूर्ण शरीरची व्यायाव करण्यास मदत करते. आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण या स्टार्सना स्विमिंग फार आवडते. (international yoga day 2023 from yoga to pilate 5 workouts that bollywood actresses Malaika Arora love to do)

अधिक वाचा-  
“आधी लगीन कोंढाण्याचं, मग…” बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, टीझर पाहून व्हाल थक्क
‘सोनपरी’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन! मृणाल कुलकर्णीबद्दल ‘या’ खास गोष्टी माहितीयेत का?

हे देखील वाचा