Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाला चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, “रामायनाची गोष्ट आहे का व्हीएफएक्स?

प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाला चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, “रामायनाची गोष्ट आहे का व्हीएफएक्स?

लोकप्रिय अभिनेता प्रभास(prabhas) मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा पडद्यावर झळणार आहे. त्यामुळे प्रभासला पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर प्रभासचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आपल्या ‘आदिपुरुष’ या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन चाहत्यांना खूश केले आहे. त्यामुळे प्रभास खूपच चर्चेत आला आहे.

अभिनेता प्रभास याच्या ‘आदिपुरुष‘ (Adipurush) या नवीन चित्रपटाचा पहिला टीझर राम भूमी म्हणजेच अयोध्यामध्ये रविवारी ( दि.2 ऑक्टोबर ) प्रदर्शित केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राउत( Om Raut) यांनी केले आहे. यामध्ये प्रभास सोबत मुख्य भुमिकेत क्रिती सेनन (Kriti Sanon) दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरवर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर काही लोकांना आवडला आणि काही लोकांनी याच्या व्हीएफएक्स प्रश्न केले आहेत. काही लोकांनी नाराजी व्यक्त करत ट्वीटरवर प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, “हा टीझर पाहून ‘मार्व्हल अ‍ॅवेंजर्स’ सिरिज आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सारख्या अनेक चित्रपटासारखे वाटत आहे.” अर्थातच ‘आदिपुष’ चित्रपटाची तुलना हॉलिवूडच्या चित्रपटासोबत केली आहे. या चित्रपटाचा टीझर काही लोकांना प्रभावी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यापैकी एका युजरने लिहिले होते की, “या चित्रपटाचे पोश्टरदेखिल नक्कल केल्याचे दिसून येत आहे. काही वर्षापूर्वी राम चरण(Ram Charan) अभिनेत्याच्या फॅनने हे बनवले होते. तुम्हीच सांगा यापैकी कोणता चांगला आहे.” आणि “दुसऱ्याने लिहिले की, पूर्वीच्या रामयनची अताच्या चित्रपटाची स्पर्धा होउच शकत नाही, चित्रपट रामायनाच्या गोष्टीनर आहे का व्हीएफएक्सवर?” अणखी एकाने लिहिले की, “या चित्रपटापेक्षा 30 वर्षापूर्वी एनिमेटेड #Ramayan, #Adipurush याच्या पेक्षा जास्त ताजे दिसत आहेत.”

 

एका युजरने तर लिहिले की, “आदिपुरुष चित्रपट पाहानाऱ्यां सगळ्यांना विरोध करा, यापेक्षा जपानी लोकांनी ओम राउतपेक्षा चांगली रामायन बनवली होती. आदिपुरष हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. एनीमेटेड कार्टून आदिपुरुष, # ओम राउत.” अजून एकाने लहिले की, “जपानी एनीमे चित्रपट #रामायन(1994) #आदिपुरूष पेक्षा खूप चागंला होता.” आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरला 2 कोटी पेक्षा जास्त वाचक मिळाले आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान (saif ali khan) -लंकेशची भूमिकेत तर क्रिती सेनन जानकी भूमिकेत दिसणार आणि सनी सिंग लक्षमच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी 2023 ला आईमॅक्स आणि 3D चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिस इंडिया बनूनही मान्या सिंगला मिळेना काम, भाईजान करणार मदत?
साऊथच्या दिग्गजांसोबत झळकणार ‘आपला सिद्धू’, ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टिझर आला समोर

हे देखील वाचा