Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आदित्य नारायणही घेणार ‘बिग बॉस १५’मध्ये सहभाग? सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा

संपूर्ण देशाला वेड लावणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. बिग बॉसच्या १४ व्या सिझननंतर सगळ्यांचे डोळे बिग बॉस १५ कडे लागले आहेत. मागील अनेक दिवसापासून बिग बॉसबाबत बातम्या येत आहेत. तसेच हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या शोमध्ये कोणते स्पर्धक भाग घेणार आहेत, याबाबत बिग बॉस प्रेमींमध्ये कुजबुज चालली आहे. अशातच मागील अनेक दिवसापासून या शोमध्ये कोणते स्पर्धक भाग घेणार आहेत, याबाबत अफवा पसरत आहेत. शोमध्ये आदित्य नारायण येणार आहे, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा चालू आहे. अशातच गायक आणि होस्ट आदित्य नारायण याने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य नारायणने तो या शोमध्ये सहभागी होणार नाही अशी माहिती दिली आहे. त्याने या सगळ्या अफवांचे खंडन करत ही माहिती दिली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीला लिहिले की, “मी बिग बॉसच्या पुढच्या सिझनमध्ये किंवा इथून पुढे कोणत्याही सिझनमध्ये सहभागी होणार नाहीये. कधी तरी या शोला होस्ट करण्याची इच्छा आहे, पण परंतु सहभागी होण्यासाठी मला इंटरेस्ट आणि वेळ देखील नाही. दरवर्षी एवढा चांगला शो करण्यासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा. मला आशा आहे की, या वर्षी देखील हा शो तेवढाच चांगला होईल.” (Aditya Narayan going to participate in bigg Boss 15, he told the truth on social media)

‘बिग बॉस’ हा शो या वर्षी सुरुवातीला एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक २४ तास कधीही त्यांच्या वेळेनुसार हा शो पाहू शकणार आहेत. सुरुवातीला ६ आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो करण जोहर होस्ट करणार आहे, पण नंतर कलर चॅनलवर हा शो पुन्हा एकदा सलमान खान होस्ट करणार आहे. या शोमध्ये निया शर्मा आणि अर्जुन बिजलानी हे सहभागी होण्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना

हे देखील वाचा