‘इंडियन आयडल’मधील परीक्षकांच्या निर्णयावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर आदित्य नारायणने व्यक्त केले मत


टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल’ होय. या शोमुळे संगीत क्षेत्राला अनेक मोठे गायक मिळाले आहेत. प्रतिभावान आणि संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा शो स्पर्धकांना उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मात्र, यावर्षी सुरू असलेला ‘इंडियन आयडल १२’ शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वादांमध्ये अडकत आहे. कधी परीक्षकांमुळे, कधी शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या वक्तव्यामुळे, तर कधी स्पर्धकांच्या एलिमिनेशनमुळे. या सर्व वादांवर या शो चा सूत्रसंचालक असणाऱ्या आदित्य नारायणने त्याचे मत एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केले आहे.

‘इंडियन आयडल’मध्ये आधीच निर्णय ठरलेले असतात, या आरोपावर मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाला, “आमचे निर्माते सोनी, फ्रेमेंटल आणि टीसीटीच्या संपूर्ण टीमसह सध्याच्या पर्वाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. गेल्या संपूर्ण दशकात सर्वाधिक पाहिलेला हा रियॅलिटी शो आहे. आम्हाला यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आम्ही आमच्या या शो ला मिळणाऱ्या निगेटिव्हिटीबद्दल विचार करत नाही. आता आम्ही शो च्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. शो चे आता शेवटचे फक्त चार आठवड्यात बाकी आहेत. हे पर्व आम्हाला प्रेमाने आणि आनंदाने संपवायचे आहे.”

स्पर्धकांबद्दल परीक्षकांना आणि येणाऱ्या पाहुण्यांना चांगले बोलण्यासाठी दबाव असतो या आरोपावर आदित्य म्हणाला, “प्रत्येक व्यक्ती ‘इंडियन आयडल’च्या सर्व स्पर्धकांबद्दल फक्त पॉझिटिव्ह बोलण्याचे उदाहरण देते. मी विश्वास देतो की, जोपर्यंत मी इंडियन आयडलचे सूत्रसंचालन करत आहे. तो पर्यंत इथे कोणालाही उगाच स्तुती करण्याची गरज नाही. आपले विचार सगळ्यांसमोर मांडा आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आमच्या शोमध्ये येऊन आम्हाला आशीर्वाद द्या. मी हे सर्व माझ्यासाठी बोलत आहे. येथे परीक्षकांवर कोणताही दबाब नाही.”

सध्या या शो ची शूटिंग मुंबई बाहेर सुरु आहे. मात्र, ग्रँड फिनालेचा भाग मुंबईमध्येच चित्रीत केला जाणार असल्याचे आदित्यने सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.