Saturday, July 6, 2024

मैत्रीची आणि चित्रपटांची व्याख्या बदलवणारा ‘शोले’ प्रदर्शित होऊन झाली तब्बल ४६ वर्ष, रमेश सिप्पींनी शेअर केली पोस्ट

आजपर्यंत बॉलिवूडच्या १०० वर्षांपेक्षा अधिकच्या इतिहासात असे अनेक सिनेमे तयार झाले. मात्र त्यातील मोजकेच सिनेमे असे होते ज्यांनी बॉक्स ऑफिसवर कमाई तर नक्कीच केली सोबतच प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केली. असाच बॉलिवूडच्या कमाईचे समीकरण आणि यशाची व्याख्या बदलावणारा सिनेमा ठरला ‘शोले.’ ‘शोले’ चित्रपटाने बॉलीवूडला एक उंचीवर नेऊन बसवले. फक्त दिग्दर्शक, निर्माते नाही तर या सिनेमातील संवाद, कथा, भूमिका, गाणी, संगीत, विनोद सर्वच अजरामर झाले. कलाकारांबद्दल काय आणि किती बोलणार? जय, वीरू, बसंती, ठाकूर, गब्बर सिंग, कालिया मौसीजी आदींसोबत बसंतीची धन्नो देखील सुपरहिट झाली. आज ४६ वर्षांनी देखील हा सिनेमा तितक्याच उत्साहाने टीव्हीवर पहिला जाते. आजही या चित्रपटाचे संवाद लोकांच्या तोंडावर असतात. बॉलिवूडची मैलाचा दगड ठरलेल्या या सिनेमाला आज प्रदर्शित होऊन तब्बल ४६ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज चाळीशी दशकांनंतरही या चित्रपटाची लोकांमधली क्रेझ जबरदस्त आहे आणि येणाऱ्या अनेक दशकांमध्ये ती अशीच कायम राहणार यात मुळीच शंका नाही.

आज ४६ वर्ष पूर्ण झालेल्या या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत ‘शोले’ चित्रपटाचे दिग्दर्शक असणाऱ्या रमेश सिप्पी यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबतच त्यांनी एक सुंदर फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजीव कुमार, धर्मेद्र, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, ए. के. हंगल, अमजद खान हे सर्व कलाकार दिसत आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ” शोले चित्रपटाला ४६ वर्ष पूर्ण झाले आहे. विश्वासच बसत नाही की, काळ इतक्या वेगाने पुढे जात आहे. या सर्व कलाकारांसोबत काम करणे एक अद्भुत अनुभव होता. सर्वाना खूप शुभेच्छा.” रमेश सिप्पी यांची ही पोस्ट काही वेळातच तुफान व्हायरल झाली आणि यावर नेटकऱ्यांसोबतच कलाकारांनी देखील रिप्लाय दिला. यासर्वांमधे धर्मेंद्र यांनी दिलेला रिप्लाय खूपच चर्चेत आला आहे.

रमेश सिप्पी यांच्या या पोस्टवर धर्मेंद्र यांनी लिहिले, “चित्रपटाला ४६ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. तुम्हीच होते, ज्यांनी या चित्रपटातला अधिक अविस्मरणीय केले. मला वाटते की या चित्रपटाच्या टीममध्ये मीच सर्वात वाईट अभिनेता होतो. माझ्यासाठी हा सिनेमा फक्त एक सहल होता. मात्र हा सिनेमा मी खूप एन्जॉय केला.”

‘शोले’ हा सिनेमा १९७५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, संजीव कुमार, जया बच्चन आणि अमजद खान मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सर्वच कलाकारांच्या कारकिर्दीतील माईलस्टोन सिनेमा ठरला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची जय-वीरू ही जोडी खूपच प्रसिद्ध झाली. आजही मैत्रीबद्दल सांगताना जय-वीरू हे उदाहरण देऊनच सांगितले जाते. मैतरची व्याख्या बदलावणारी ही जोडी तुफान गाजली. सोबतच हेमा मालिनी यांनी साकारलेली प्रचंड बडबड करणारी धीट बसंती देखील प्रेक्षकांना खूपच आवडली. जया बच्चन यांना सिनेमात कमी संवाद होते, मात्र त्यांचा वावर आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी, चेहऱ्यावरील एक्सप्रेशनने प्रेक्षकांच्या मनावर छाप पडली.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी       दिल्या प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

अरे बापरे! भारती सिंगने भर शोमध्ये ‘या’ स्पर्धकाच्या वडिलांना केले ‘किस’, आईची या प्रकरणावर ‘ही’ होती रिऍक्शन

 

हे देखील वाचा