इंटरनेटवर गाजतंय ‘काला दामन’ गाणं, दोन दिवसांत पार केलाय तब्बल ५४ लाख व्हिव्जचा टप्पा


गायिका रेणुका पंवार ही हरियाणवी संगीतातली एक नवी स्टार बनली आहे. रेणुका पंवारने नुकतेच तिच्या ’52 गज का दामन’ या हरियाणवी गाण्याने बरीच प्रसिद्धी मिळवली. आता तिने ‘काला दामन’ नावाचे आणखी एक गाणे रिलीज केले आहे. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे गाणे अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज झाले आहे. हरियाणवी गाणी फक्त हरियाणामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात ऐकायला मिळत आहेत आणि त्यात जर गाणे रेणुका पंवारचे असेल मग तर काय मज्जाच मज्जा! लोक तिच्या गाण्यांचे प्रचंड वेडे आहेत. हे गाणे चाहत्यांकडून परत परत पाहिल्यामुळे त्याचे व्हिव्ज लाखोंच्या घरात गेले आहे.

गाण्यात केडी आणि रेणुका पंवार यांनी अनुक्रमे नायक व नायिकेची भुमिका साकारली आहे. या गाण्यात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

याव्यतिरिक्त नुकतेच आलेले तिचे आणखी एक गाणेही प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. या गाण्याचे बोल आहेत ‘छन छन’. या गाण्याला तीन दिवसांत सुमारे 1 दशलक्ष व्हिव्ज मिळाले आहेत. हे गाणे रेणुका पवारने गायले असून दक्ष कंबोज खेडा यांनी लिहिले आहे. या गाण्याला गुलशन यांनी संगीत दिले आहे. हे गाणे रेणुका पंवार, के डी आणि ए.के.जट्टी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

रेणुका पंवार यांच्या हरियाणवी गाण्यामुळे तिची फॅन फॉलोइंग प्रचंड वाढत आहे. रेणुका पंवार यांच्या गाण्यामध्ये उत्कृष्ट संगीत, मधुर आवाज आणि सुंदर सादरीकरण आहे, ज्यामुळे हे इतर हरियाणवी गाण्यांपेक्षा वेगळे आणि खास आहे. ती स्वत: एक उत्तम नर्तक आहे आणि तिची प्रत्येक गाण्यातील उपस्थिती चाहत्यांना त्या गाण्याशी बांधून ठेवते.

सपना चौधरी हिच्यासोबत तिचे ‘चटक मटक’ आणि नुकतेच ‘हरियाणवी बीट’ हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. अशा प्रकारे रेणुका पवार एकामागोमाग एक सुपरहिट गाणे देत आहे. भविष्यातही ती चाहत्यांसाठी अनेक धमाके गाणे आणेल यात शंका नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.